| दीड तोळे सोने व आयफोनची चोरी | ९ प्रमुख आरोपींसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील लोणी हवेली गावामध्ये...
| दीड तोळे सोने व आयफोनची चोरी | ९ प्रमुख आरोपींसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील लोणी हवेली गावामध्ये पारनेर नगरपंचायती नगराध्यक्ष विजय औटी यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या वादातून १४ मे रोजी रात्री नऊ वाजता दोन गटात राडा झाला.
दोन गटातील हाणामारीमध्ये नीलेश बाळासाहेब कोल्हे (रा. लोणी हवेली) यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून गलोलीने दगड मारल्याने त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पारनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी ९ प्रमुख आरोपींसह २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दीड तोळे सोने व आयफोनची चोरी झाल्याची फिर्याद संभाजी बाबुराव थोरे (वय ४७, रा. लोणी हवेली) यांनी दिली आहे. या दोन गटातील राड्यामुळे लोणी हवेली गावात रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता.
माझा मेव्हणा नीलेश बाळासाहेब कोल्हे (रा. लोणी हवेली) याने आमच्या गावात दि. १८ एप्रिल रोजीनगराध्यक्ष विजय औटी यांचे वाढदिवसाचा बॅनर लोणी हवेली स्टँडवर लावला होता. तो बॅनर आमचे गावातील अनिकेत सुभाष शेळके व रोहीत सुनिल शेळके यांनी फाडला होता. त्याबाबत माझा मेव्हणा नीलेश कोल्हे याने विचारले तेव्हा किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली होती. रविवार दिनांक १४ मे रोजी रात्री ९ वाजता लोणी हवेली स्टँडवर थांबलो होतो. त्यावेळी तेथे माझा मेव्हणा नीलेश बाळु कोल्हे, माझा पुतण्या विजय पोपट थोरे, गावातील संकेत भरत नवघने गप्पा मारीत होते. त्याच वेळी तेथे रोहीत सुनिल शेळके, अनिल उत्तम शेळके, मिठु गोलवड, अक्षय शेळके, समिर शेळके, अनिकेत शेळके, अमोल माळी, साईनाथ राक्षे (पुर्ण नांव माहीत नाहीत, सर्व रा. लोणी हवेली) तसेच अनोळखी २० ते २५ लोक मोटारसायकलवर आले.
त्यांनी माझा मेव्हणा नीलेश व पुतण्या विजय यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच बॅनर आंम्हीच फाडला, असे म्हणून वाद घातला तेव्हा त्यातील रोहीत शेळके, अनिल शेळके व अमोळ माळी याचे हातात गिलवर होत्या. त्या गिलवरीने दगड मारले. त्यात नीलेश कोल्हे व विजय थोरे यांना दगड लागले. मिठु गोलवड, अक्षय शेळके व समिर शेळके यांनी काठ्यांनी वरील दोघे व संकेत भरत नवघने याला मारहाण केली. ते पाहुन तेव्हा मी भांडणे सोडविण्यास गेलो असता तेथे अनिल उत्तम शेळके याने तलवार आणून माझ्या मागे धावला. अमोल माळी व साईनाथ राक्षे यांनी लाथाबुयांनी मला व नीलेश कोल्हे याला मारहाण केली. त्यावेळी तेथे गणेश दादाभाऊ दुधाडे याचा आयफोन ११ कोणीतरी तरी त्याचे पॅन्टचे खिशातुन काढुन घेतला.
माझे स्वतःची गळयातील दीड तोळा वजनाची चैन कोणीतरी हिसकावून घेतली. विजय पोपट थोरे यांचे गळ्यातील सोन्याची चैन अज्ञाताने काढुन घेतली. कोणीतरी अज्ञात ३ लोकांनी कोयते घेवून आमचे अंगावर धाऊन आले. मारहाणीत नीलेश बालु कोल्हे याला तोंडावर, डोयास, तसेच विजय पोपट थोरे याचे मानेवर पाठीला मार लागला. सदर भांडणे अमोल विक्रम दुधाटे, कृष्णाजी मारुती कोल्हे वगैरे लोकांनी सोडविली. त्यांना मंगेश औटी यांनी पारनेर ग्रामीण रुग्नालयात औषधोपचारासाठी घेऊन गेले. तेथे उपचार घेऊन आनंद हॉस्पीटल पारनेर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
१४ मे रोजी लोणी हवेली येथे नगराध्यक्ष विजय औटी यांचा बॅनर फाडला म्हणून जाब विचारल्याचा राग धरुन रोहीत सुनिल शेळके, अनिल उत्तम शेळके, मिठु गोलवड, अक्षय शेळके, समिर शेळके, अनिकेत शेळके, अमोल माळी, साईनाथ राक्षे (पुणे नांवे माहीत नाहीत) सर्व रा. लोणी हवेली ता. पारनेर तसेच अनोळखी २० ते २५ यांनी मारहाण केल्यामुळे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली पो.हेड.कॉन्स्टेबल शिवाजी कदम करत आहेत.
COMMENTS