जळगाव। नगर सहयाद्री - जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफ...
जळगाव। नगर सहयाद्री -
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश सुरेश शेरे (वय १९) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, जळगाव-औरंगाबाद रोडवर औद्योगीक वसाहत शेजारील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी गेला.
आकाश हा टपरीवर का आला नाही? याचा विचार करत आई सविता ह्या घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यानंतर आईने एकच हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.
COMMENTS