यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याच्या स्वागताने इतिहासाला उजाळा : आ. जगताप अहमदनगर | नगर सह्याद्री इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल १८ वेळा ...
यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याच्या स्वागताने इतिहासाला उजाळा : आ. जगताप
अहमदनगर | नगर सह्याद्री
इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल १८ वेळा पराभुत करणारे शूर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्ययात्रेचे पुणे ते इंदौर आयोजित करण्यात आले असून, ही शोर्य यात्रा नगरला आली असता, भव्य स्वागत करण्यात आले. नगर बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास स्वप्निलराजे होळकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शौर्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, मनोज कोतकर, योगेश ठुबे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, मराठा सम्राज्याच्या मोठा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक सरदार, सेनापती यांनी मराठा सम्राज्याचे विस्तार केला आणि टिकून ठेवले. यात थोर सेनानी मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर यांचे योगदान मोठे राहिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर नगरचे आहे, याचाही नगरकरांना मोठा अभिमान आहे.
इंदौर शहरात उभारण्यात येणार्या यशवंतराव होळकरांचा पुतळ्यामुळे त्यांचा इतिहास नवीन पिढीला अवगत होऊन प्रेरणा देत राहिल. नगरमधून जात असलेल्या पुतळ्याचे नगरकरांनी स्वागत करुन इतिहासाला उजाळा देण्याचे काम केले आहे, असे सांगून नगरमध्ये अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकासाठी प्रयत्न करु, असे सांगितले.
उपनगरामध्ये पाईपलाईन रोडवरील पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपालीताई बारस्कर, माजी नगरसेविका शारदाताई ढवण, निखिल वारे, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे यांनी स्वागत केले.
यावेळी स्वप्नील राजे होळकर (इंदोर) , राजेंद्र पाचे, अशोक भोजने, वसंत दातीर, राजेंद्र तागड, निवृत्ती दातीर, प्रा.शरद दलपे, चंद्रकांत तागड, निशांत दातीर, ज्ञानदेव घोडके, ज्ञानेश्वर भिसे, ऋषी ढवण, अशोक भिटे, खंडू कजबे, संजीव भोगे, ज्ञानदेव तागड, अक्षय भांड, विजय कुलाळ, दिलीप तागड, माऊली कजबे, अतुल लांभाते, विनोद पाचरणे, बाबासाहेब तागड, अनिल ढवण, काका शेळके ,सुरेश तागड,आश्विन तागड,आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शौर्य यात्रेच्या मार्गवर धनगर समाजाचे पारंपारिक गजनृत्य, घोडे, ध्वजधारी पादचारी असा दिमाखदार सोहळा साजरा केला.
या शौर्ययात्रेच्या निमित्ताने , केडगांव ते गंगा लॉन या मार्गावर विविध ठिकाणी स्वागत झाले.यानंतर यात्रा स्टेट बँक चौक, डिएसपी चौक, प्रेमदान चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक तसेच भिस्तबाग या ठिकाणी समाज बांधवांच्यावतीने या शौर्ययात्रेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन पायी मिरवणुकीने जाऊन गंगा लॉन येथे मुक्काम होता. दुसर्या दिवशी सकाळी ही यात्रा राहुरी मार्गेइंदौरकडे रवाना झाली.
COMMENTS