पुणे। नगर सहयाद्री - पुणे शहरातील वाघोली येथे मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला आग लागल्याची बातमी समोर अली आहे. या आगीत चार सिलेंडरचा स्फो...
पुणे। नगर सहयाद्री -
पुणे शहरातील वाघोली येथे मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला आग लागल्याची बातमी समोर अली आहे. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पुणे शहरातील वाघोली मधील उबाळे नगर मध्ये असलेल्या 'शुभ सजावट' या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोदामाला शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता भीषण आग लागली.या घटनेत ४ सिलिंडर भीषण स्फोट झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान ही आग कशामुळे लागली, हे कारण समजू शकले नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले.परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.
COMMENTS