नाशिक। नगर सहयाद्री - गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात देखील हुल्लडबाजी करण्यात आ...
नाशिक। नगर सहयाद्री -
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात देखील हुल्लडबाजी करण्यात आली.नाशिकमधील कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन तास विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मर्यादित होते. मात्र सर्वच प्रेक्षक स्टेजजवळ जमा झाल्याने एकच गर्दी झाली होती.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही मद्यपी तरुणांनी या पत्रकारांना मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी ही मागणी केली आहे.
COMMENTS