सुपा | नगर सह्याद्री आपधुप गावाच्या जनतेने बाळासाहेब विखेंपासून आजतागायत विखे कुटूंबावर अतोनात प्रेम केले आहे. आपधूपच्या विकासासाठी निधी कमी...
सुपा | नगर सह्याद्री
आपधुप गावाच्या जनतेने बाळासाहेब विखेंपासून आजतागायत विखे कुटूंबावर अतोनात प्रेम केले आहे. आपधूपच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपधुप येथे बोलताना दिली.
खंडेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी आपधूप येथे भेट देऊन खंडेश्वरांची महाआरती केली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, जून अखेर पारनेर तालुयातील मोजणी अर्ज निकाली काढणार असून बांधावरून होणारी भांडणे थांबवणार आहे. प्रधानमंत्री योजनेसाठी लाभार्थीना पाच ब्रास वाळू शासनातर्फे मोफत दिली जाणार असल्याची घोषणा डॉ. विखे यांनी याप्रसंगी केली.
तालुयात वाळू तस्करांना चाप लावून तालुयातील गुंडगिरी मोडीत काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपधुप ते एमआयडीसी रस्ता व हंगा नदीवरील दोन पुलांना तीन महिन्यात मंजुरी देण्याचा शब्द त्यांनी यावेळी ग्रामस्थाना दिला. याप्रसंगी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, युवा नेते राहुल पाटील शिंदे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, सुप्याचे सरपंच योगेश रोकडे, सागर मैड, दत्तात्रय पवार यांच्यासह अनेक गावांचे सरपंच व चेअरमन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष संतोष गवळी यांनी केले. याप्रसंगी नामदेव गवळी व जयसिंग गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. योगेश गवळी यांनी सुत्रसंचालन केले तर रामचंद्र गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किसनराव गवळी, सचिव अशोक गवळी, लक्ष्मण गवळी, विजय सोनवणे, गोकुळ गवळी, मंगेश गवळी, जयसिंग गुलाब गवळी, निकेश गवळी, उत्तम दत्तू गवळी, किसन भगवंत गवळी, बन्सी गवळी आदिंसह ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS