मुंबई नगर सह्याद्री : लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने शहरात नोकरीनिमित्ताने असणाऱ्याना आता सुट्टीत गावी जाण्याचा विचार करत अस...
मुंबई नगर सह्याद्री :
लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने शहरात नोकरीनिमित्ताने असणाऱ्याना आता सुट्टीत गावी जाण्याचा विचार करत असेल तर मोठी आनंदाची बातमी असून महामंडळाने दररोज अतिरिक्त ४४१ बसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह नेहमीच्या फेऱ्या ही धावणार आहे. मात्र स्थानक-आगारांत वाढत असलेली गर्दी आणि एसटीच्या वाढीव फेऱ्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. उन्ह्याळासाठी या विशेष गाड्या सुरु केल्या असून जूनच्या १५ तारखेपर्यत या गाड्या धावणार असल्याचे समजते. महामंडळाच्या ६ प्रदेशांपैकी छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सर्वाधिक १२८ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबईतून (१०१), पुणे (९७), नाशिक (८०), नागपूर (१०) अमरावती (२५) या प्रदेशातदेखील रोज विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. सुट्टीनिमित्त पर्यटनस्थळे, देवस्थाने येथे जाण्याकडे प्रवाशांचा मोठा कल आहे. ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना तिकीटदरात निम्मी सवलत मिळाल्याने प्रवासीसंख्या वाढणार आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज एसटी अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेv
COMMENTS