मुंबई । नगर सह्याद्री - उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 'फडतूस गृहमंत्री' म्हटले...
मुंबई । नगर सह्याद्री -
उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 'फडतूस गृहमंत्री' म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना उत्तर देताना 'मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा' असे म्हटले आहे.
आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत म्हटले की, 'झुकेगा नही घुसेगा साला, हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पाईंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्षे कळले नाही. आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव.
उद्धव ठाकरे यांनी पीडित रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं, की, राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरे यांनी पीडित रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले, की, राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी म्हटलं की, मी फडतूस नाही, तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचितही सन्मान नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
COMMENTS