सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुपा | नगर सह्याद्री- पारनेर ते सुपा या राज्य मार्गावर पारनेर पासून अंदाजे १५ कि.मी अंतरा...
सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सुपा | नगर सह्याद्री-
पारनेर ते सुपा या राज्य मार्गावर पारनेर पासून अंदाजे १५ कि.मी अंतरावर एमआयडीसी चौक आहे. या चौकातून पारनेर कडे येताना दुतर्फा विविध प्रकारचे वृक्षाची सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्ग करतांना लागवड केली होती. वृक्ष पण २५ ते ३० फुटा पर्यंत डोलदार वाढलेले होते. वाटसरू या गार हवेचा आनंद घेत होता. छोटी छोटी वृक्ष असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी लहान मुलां प्रमाणे या वृक्षांचा सांभाळ करून वाढवली होती. मात्र सुपा व हंगा परीसरात काही स्वार्थी अज्ञात व्यक्तीनी स्वार्थासाठी एवढी मोठी केलेली झाडे हळूहळू तोडून टाकण्याचा धडाका लावलेला आहे. आता पर्यंत बरीच झाडे नेस्तनाबूत केली आहे. हे अज्ञात व्यक्ती अगोदर झाडाची फांदी तोडून टाकतात व हळू हळू झाडाच्या मुळावर घाव घालतात. असा कुटीर उद्योग या स्वार्थी अज्ञात व्यक्ती कडून पहावयास मिळत आहे. या अज्ञाताना कोणीच टोकणार नसल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे. पारनेर सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व प्रकारा कडे जाणीव पूर्वक डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे.
पारनेर ते सुपा दुतर्फा रस्त्यावर विविध प्रकारचे वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. या मध्ये सिसम, कडू लिंब, चिंच, तसेच विविध प्रकारचे वृक्ष लावलेले आहेत. पारनेर ते सुपा रस्त्याचे डांबरीकरण सूरू होते त्या वेळेस दुतर्फा या वृक्षाची लागवड करण्यात आली होती. या रस्त्यावर ही झाडे २० ते २५ फूटा पर्यंत डोलदर वाढलेली आहेत. पण एम आय डी सी चौक येथील बरेचसे वृक्ष काही परिसरातील अज्ञात व्यक्तीनी स्वार्थासाठी स्टेप बाय स्टेप वृक्ष तोडण्यास सुरुवात केलेली निदर्शनास येत आहे. हे अज्ञात व्यक्ती वृक्ष बिनदिक्कत तोडत आहेत. त्यांना टोकणार व बोलणार कोणी नसल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे. समाजातील वृक्ष प्रेमींनी या अज्ञाता विरुद्ध मोहिम हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हे अज्ञात झाडे तर लावणार नाहीत पण लावलेली झाडे तोडण्याची काम पहिले करतील. संबंधित विभागाने जर या विषया कडे गांभीर्याने पाहिलं नाही तर काही महिन्यात सर्व झाडे नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी संबंधित विभागाने या अज्ञात विरूद्ध जोरदार मोहीम राबवून राहिलेली झाडे वाचवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अविनाश पवार यांनी केली प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
रस्त्यावर अनधिकृत बांधकामे होत असल्याने अज्ञतांकडून झाडे तोडली जात आहेत. हे तात्काळ थांबले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात मनसे स्टाईल आंदोलनं केली जाईल.
-अविनाश पवार,मनसे नेते.
COMMENTS