अहमदनगर | नगर सह्याद्री शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हे ओळखून या उदात्त भावनेने महात्मा ज्योतीबा फुले यांनी केलेले कार्य आजच्या शिक्षित झालेल्य...
अहमदनगर | नगर सह्याद्रीशिक्षणाशिवाय प्रगती नाही, हे ओळखून या उदात्त भावनेने महात्मा ज्योतीबा फुले यांनी केलेले कार्य आजच्या शिक्षित झालेल्या समाजातून दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करुन शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याचा आदर्श, विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.न्यू टिळक रोड येथील नंदनवन मित्र मंडळ व शिवसेना शाखेच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, गिरीष जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, योगीराज गाडे, सचिन शिंदे, दीपक खैरे, संतोष गेनप्पा, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, शरद कोके, गौरव ढोणे, अरुण झेंडे, डॉ. श्रीकांत चेमटे, रवी जाधव, आदेश जाधव, विशाल जाधव, सुरज जाधव, अभिजित आबनावे आदी उपस्थित होते.
दत्ता जाधव म्हणाले, खितपत पडलेल्या समाजाला उत्सर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यामुळेच जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. त्यांनी त्याकाळी समाज सुधारणेचे केलेल्या कार्यामुळेच आज समाजात बंधूभाव निर्माण होऊन समाज प्रगती साधत आहे.
संभाजी कदम, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर आदींची यावेळी भाषणे झाली. आदेश जाधव यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. महापुरुषांचे विचार जनसामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. सुरज जाधव यांनी आभार मानले.v
संभाजी कदम, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर आदींची यावेळी भाषणे झाली. आदेश जाधव यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. महापुरुषांचे विचार जनसामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. सुरज जाधव यांनी आभार मानले.v
COMMENTS