मुंबई । नगर सह्याद्री - संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्...
मुंबई । नगर सह्याद्री -
संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला असून कोणाचाही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हि वज्रमुठ एकमेकांवर उगारतील अशी टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे आघाडीत एकमेकांवरच विश्वास राहीला नाही. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेऊन आणि भाजपशी विश्वासघात करून शिवसेना सत्तेत बसली. काँग्रेस अस्तित्वासाठी धडपड करतेय. या दोघांचा फायदा घेऊन राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. सभेला वज्रमुठ नाव दिले असले तरी भविष्यात हे तिन्ही पक्ष एकमेकांवर मुठ उगारतील; अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या सभेवर दिली आहे.
वज्रमुठीकडे आणि उभ्या केलेल्या या तमाशाकडे कोणीही लक्ष देणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. पुढील सर्वच निवडणूकांमध्ये भाजप शिवसेनाच सत्तेवर दिसेल; असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
COMMENTS