कोल्हापूर नगर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या कर्ना...
कोल्हापूर नगर सह्याद्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांच्या कर्नाटकातील समाधीच्या विकासासाठी निधी दिल्या नसल्याने साडेतीनशे वर्षांनंतरही शहाजी महाराजांचे समाधीस्थळं जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत राहिले आहे. राजकीय पक्षानीनिधी उपलब्ध करून न दिल्याने तेथील मराठी बांधवांची धडपड व्यर्थ गेली आहे. कर्नाटकातील तीन सरकारने जाहीर केलेला साडेतीन कोटींचा निधी खर्च न होता परत गेला, विधानसभा निवडणुकीच्या अनुषगांने ५ कोटींची घोषणाकरण्यात आली आहे. हा निधीही माघारी जाऊ नये यासाठी मराठी बांधवांनी आवाज उठवला आहे. शहाजी महाराज यांचे २३ जानेवारी १६६४ रोजी कर्नाटकातील होदिगेरे येथे निधन झाले. याठिकाणी त्यांची समाधी आहे. राज्य सरकारने या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले. त्यानंतरही या समाधी स्थळाचा जिर्णोद्धार करण्यात आला नाही.
विश्वास पाटील यांनी आवाज उठवल्यानंतर विकासासाठी पाऊल उचलले गेले. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमानातून पाच लाखाचा निधी दिला. शहाजी स्मारक समितीकडे हा निधी देण्यात आला. त्यानंतर कामाला गती मिळाली नाही. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही समाधीची स्थिती कायम आहे. सीमावादामुळे वाद पेटत राहिला. या वादामुळे शहाजी महाराजांचे समाधीस्थळाचा विकासाकडे दुर्लक्ष राहिले. दोन राज्यच्या वादामुळे मराठी बांधवांच्या मागणीकडे कर्नाटक सरकार नेहमीच दुर्लक्ष करते. कर्नाटकात भाजप, काँग्रेस आणि जनता दलाची सत्ता असताना तीन वेळा, दोन कोटी, एक कोटी आणि पन्नास लाख असा निधी देण्याची घोषणा झाली. पण समाधीस्थळाला पुरेशी जागा नाही असे कारण पुढे करून हा निधी परत गेला. सध्या तेथे एक एकर जागा असून अजून जागेची गरज आहे, ती जागा मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.
COMMENTS