प्रियांका चहर चौधरी काही दिवसांपूर्वी अंकित गुप्ताच्या 'जुनूनियत' शोच्या सेटवर दिसली होती. आता ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत,
मुंबई / नगर सह्याद्री -
'बिग बॉस १६ संपला असेल, परंतु त्याच्या स्पर्धकांशी संबंधित बातम्या रोजच चर्चेत असतात. शोमध्ये मित्र असलेले एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यातील मतभेद आता समोर आले आहे, या सीझनचे आवडते जोडपे अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी देखील त्यांच्या आउटिंगने मन जिंकत आहेत,अंकित गुप्ताने या सीझनमध्ये सह-स्पर्धक असलेले चित्रपट निर्माता साजिद खान यांच्याकडे त्याच्या पुढच्या चित्रपटाबद्दल मोठी मागणी केली आहे.
प्रियांका चहर चौधरी काही दिवसांपूर्वी अंकित गुप्ताच्या 'जुनूनियत' शोच्या सेटवर दिसली होती. आता ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत, परंतु यावेळी प्रियांका-अंकितसोबत साजिद खान देखील उपस्थित होता. साजिद खान आणि अंकित गुप्ताची घट्ट मैत्री 'बिग बॉस १६ मध्येही पाहायला मिळाली होती. शो सपल्यानंतरही त्यांचे नाते कायम आहे. यासाठी काल रात्री तिघेही मुंबईत एकत्र स्पॉट झाले.
साजिद खान,अंकित गुप्ता आणि प्रियांका चाहर चौधरी यांनीही माध्यमांशी संवाद साधला. अंकितने साजिदकडे अशी मागणी केली, ज्यामुळे प्रियांकाचे चाहते खुश झाले .बोलताना अंकित गुप्ताने साजिद खानला सांगितले की, तुम्ही आता 'आशिकी 4' बनवू शकता आणि त्यात तुम्ही दोघांनाही कास्ट करू शकता.
अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर चौधरी यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याबद्दल बोलताना साजिद खान म्हणाला, 'जसे आम्ही शोमध्येही सांगितले होते की घरातून बाहेर पडल्यानंतर भेटू. शो सोडल्यानंतर अंकित त्याच्या शोमध्ये खूप व्यस्त झाला. पण मुंबईत आल्यावर त्याने भेटण्याचा बेत आखला. मी आणि प्रियांका अंकितशी फोनवर बोलत राहतो आणि यावरून हे सिद्ध होते की आमचे घरातील नाते खरे होते. ते कॅमेऱ्यांसाठी नव्हते. कारण आम्हाला मित्र बनायचे आहे.
COMMENTS