शिर्डी नगर सहयाद्री देशातील दोन नंबरचे देवस्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीतील साईबाबाच्या समाधीचे रामनवमी उत्सवानिमित्त २ लाख भाविकांनी दर्...
शिर्डी नगर सहयाद्री
देशातील दोन नंबरचे देवस्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीतील साईबाबाच्या समाधीचे रामनवमी उत्सवानिमित्त २ लाख भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनानिमित्त भक्त साईच्या झोळीत भरभरून दान टाकत असतात. शिर्डीतील राम नवमीच्या ३ दिवसीय उत्सवात साईच्या झोळीत ४ कोटी ९ लाखांचे दान जमा झाले. असल्ल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. उत्सवकाळात साईभक्तांकडून साईबाबा संस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होत असते. या उत्सवात साईच्या झोळीत भकत्यानी झोळीत टाकलेल्या दानातून संस्थानला १ कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये, देणगी काउंटरव्दारे ७६ लाख १८ हजार १४३ त्याचबरोबर ऑनलाइन स्वरुपात देणगीही मिळाल्या आहे. यासोबत सोने चांदी स्वरूपात काही देणगी प्राप्त झाली आहे. या उत्सवात संस्थानच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी यांनी मोठ्या प्रमाणात परीक्षम घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. साई बाबा झोळीत नेहमी मोट्या प्रमाणात दान जमा होते.
COMMENTS