आता बातमी येत आहे की रिया लवकरच 'एमटीव्ही रोडीज'च्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागला आहे. आता बातमी येत आहे की रिया लवकरच 'एमटीव्ही रोडीज'च्या नवीन सीझनमध्ये दिसणार आहे. नुकताच निर्मात्यांनी शोचा प्रोमो रिलीज केला.
'एमटीव्ही रोडीज'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नवीन प्रोमोमध्ये सोनू सूदने खुलासा केला आहे की, शोचा आगामी सीझन मागील सीझनपेक्षा अधिक कठीण असणार आहे. मीडिया वृत्तानुसार म्हटले तर रिया चक्रवर्तीशोची नवीन गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'एमटीव्ही रोडीज' शो तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. आता रियाचे येणे सर्वांनाच धक्कादायक ठरणार आहे.
या शोमध्ये येणे प्रत्येक स्पर्धकासाठी अडचणींनीने भरलेले आहे. ग्रुप मुलाखतीपासून वैयक्तिक मुलाखत फेरीपर्यंत, रोडी बनण्याचा आणि विजेतेपद मिळवण्याच्या प्रवासाला खूप वेळ लागतो. गेल्या सीझनमध्ये रणविजय या शोचा भाग नव्हता. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी सोनू सूदच्या जागी नवीन गटाचा लीडर म्हणून निवड केली होती. इतकेच नाही तर मागील सीज़नमध्ये सर्व माजी स्पर्धक विरुद्ध नवीन स्पर्धक यांच्यात स्पर्धा होती.
या नवीन सीझनमध्ये सोनू सूदही रियासोबत शोमध्ये परतणार आहे. या नव्या सीझनमध्ये रियाशिवाय गौतम गुलाटीही गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. गौतमला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. आता हा शो प्रेक्षकांपेक्षा रियासाठी कठीण जाणार आहे, कारण सुशांतच्या मृत्यूनंतर प्रेक्षक तिला पाहणेही पसंत करत नाहीत. अशा परिस्थितीत ती लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो.
COMMENTS