नवी दिल्ली नगर सहयाद्री : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने ...
नवी दिल्ली नगर सहयाद्री :
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच रद्द केला होता. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याची चर्चा होती. हि चर्चा संपल नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पक्षाला देण्यात आलेला बंगला व भूखंड काढून घेण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्ली सरकारकडून लवकरच तशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला पाठवली जाऊ शकते. या दोन्ही राजकीय पक्षांना देण्यात आलेले सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिकिया येतात हे बघावे लागेल.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि CPI यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस पक्षालाही दिल्लीत देण्यात आलेली जमीन सोडावी लागू शकते. तृणमूल काँग्रेसला पक्ष कार्यालय बांधण्यासाठी दिल्लीत ही जमीन देण्यात आली होती. दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भूखंडाची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून अनेक भूखंड पाहण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंत न पडल्यामुळे पक्ष कार्यालय बांधण्यात आले नव्हते. तर दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावर तृणमूल काँग्रेस पक्षाला १००८ स्क्वेअर मीटरचा भूखंड देण्यात आला होता. मात्र, या जमिनीवर दोन मंदिरं आणि आणखी काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी भूखंड मिळूनही तृणमूल काँग्रेसने त्याचा ताबा घेतला नव्हता. परंतु, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने हा भूखंडही तृणमूलच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.v
COMMENTS