पुणे नगर सह्याद्री : धक्काधकीच्या जीवनशैलीचा तरुणाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. या धक्काधकीच्या जीवनशैल...
पुणे नगर सह्याद्री :
धक्काधकीच्या जीवनशैलीचा तरुणाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. या धक्काधकीच्या जीवनशैलीमुले पुण्यातील तरुणाचे आरोग्य धोक्यात येत असून यामुळे तरुणांमध्ये लठ्ठपणा, मधुमेहाची वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील ४७ टक्के २५ वर्षांखालील तरुणींना आणि ३९ टक्के तरुणांना लठ्ठपणा होण्याचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरातील १२ हजार जणांची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी जून २०२० ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘इंडस हेल्थ प्लसकडून करण्यात आलेल्या अहवालातून हि माहिती समोर आली. या अहवालातून समोर आले कि २० टक्के पुरुषांना तर १७ टक्के महिलांना मधुमेहाचा धोका निर्माण झाला आहे. तसेच ४० टक्के महिलांना आणि ३५ टक्के पुरुषांना ‘अथेरोस्क्लेरोसिस’ होण्याचा धोका असल्याची बाब समोर आली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना ‘अनिमिया’ होण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरातील २९.३ टक्के महिलांना तर ५.६ टक्के पुरुषांना ‘अनिमिया’ होण्याची शक्यता आहे. ‘तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण मोठ्या पध्दतीने दिसून येत आहे. पुण्यातील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. आरोग्यसाठी धोकादायक असलेल्या खाण्याच्या सवयी, बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा व मधुमेहाच्या प्रमाणात वाढ होताना दिसून आली आहे. मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहारामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो.
लठ्ठपणाचा वाढण्याची कारणे
-बाहेरील पदार्थ खाण्याच्या सवयी
- बसून काम करणे
- बदलत असलेली जीवनशैली
- वाढता तणाव
- मद्यपान व तंबाखूचे सेवन
- व्यायामाचा न करणे
COMMENTS