पारनेर | नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील न्यू आर्टस् पारनेर महाविद्यालय नॅक पूनर्मूल्यांकनात ए ++ ग्रेड मिळवून सर्वोच्च स्था...
पारनेर | नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील न्यू आर्टस् पारनेर महाविद्यालय नॅक पूनर्मूल्यांकनात ए ++ ग्रेड मिळवून सर्वोच्च स्थानावर पोहचल्याचा आनंद संस्थेच्या पदाधिकार्यांना व कर्मचारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दर्जेदार उत्तम सोयी सुविधा युक्त असल्याने नॅक पूनर्मूल्यांकनात ए ++ सर्वोच्च ग्रेड दिला असल्याने समाधान व्यक्त करत जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर महाविद्यालयाचे नुकतेच चौथ्या सायकलचे नॅक पुनर्मूल्यांकन पार पडले. त्यामध्ये महाविद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नॅक पूनर्मूल्यांकनात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. नेक मूल्यांकन प्रक्रियेत उत्तराखंड येथील कुलगुरू होशीयार धामी, कर्नाटक येथील रंगप्पा व अरुणाचल प्रदेश येथील खांडू हे सर्व सदस्य सहभागी झाले होते. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बी.ए ,बी.कॉम,बी.एस्सी बीबीए- सीए, बी.एस्सी (संगणकशास्त्र ), एम.एस्सी रसायनशास्त्र (ऑरगॅनिक आणि अॅनालिटिकल ), एम.एस्सी, (फिजिस ), एम.एस्सी (गणित ), एम.एस्सी (बॉटनी ), एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स ), एम.कॉम., एम.ए (मराठी ,भूगोल , हिंदी, इंग्रजी,), सॉफ्टवेअर अँण्ड रिनेवेबल एनर्जी तसेच वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, हिंदी या विषयांचे पीएच् .डी सेंटर अद्यावत आहेत तसेच भौतिकशास्त्र, मराठी या विषयांचे पीएच.डी रिसर्च सेंटर नव्याने सुरु होत आहेत.
महाविद्यालयात सुसज्ज विज्ञान, कॉम्प्युटर व भाषा विषयक प्रयोगशाळा, अद्यायावत व्हर्चुअल लासरूम, ई-लायब्ररी व इंटरनेट सुविधा, नियमित पालक सभेद्वारे प्राचार्य शिक्षक चर्चासत्रांचे नियोजन, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, उज्वल भवितव्यासाठी करिअर मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन, लास टेस्ट व सेमिनार इत्यादींचे यशस्वी आयोजन, वैयक्तिक लक्ष व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा इ.विशेष भर, अभ्यासेतर उपक्रमांत विद्यार्थ्यांना असंख्य संधी, कृती व प्रात्यक्षिकांवर आधारित शिकविण्याची सुविधा, विद्यार्थिनींसाठी सुसज्ज राजमाता जिजाऊ वसतिगृह तसेच स्वतंत्र रिडींग रूमचीही व्यवस्था तसेच उत्कृष्ट मेस व सुरक्षित अशा प्रकारचा स्वच्छ व सुंदर असा परिसर, तसेच विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र वसतिगृहाची सोय, उत्कृष्ठ मेसची सुविधा उपलब्ध, ऑडिओ-व्हिडिओ पद्धतीने मार्गदर्शन, भव्य सेमिनार हॉल, विविध शिष्यवृत्तींची सोय, ऑनलाइन टिचिंगची उत्तम सुविधा, सुसज्ज क्रीडांगण, आधुनिक क्रीडा साधने,प्रशस्त जिमखाना हॉल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयातंर्गत विद्यार्थी अपघात विमा योजना, स्वतंत्र प्लेसमेंट कक्ष व कॅम्पस इंटरव्ह्यू इत्यादींचे आयोजन अतिशय यशस्वीरित्या करण्यात येते.
याबरोबरच बदलत्या काळाबरोबर यशस्वी होण्यासाठी सी, सी प्लस प्लस, कोर जावा, व्हीबी, व्हिबी.नेट या विषयांचे व मॅनेजमेंट विषयांचे अद्यावत ज्ञान. आय.सी.टी, फंशनल इंग्लिश, आय.टी. अॅण्ड जर्नालिझम, कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, नर्सरी मॅनेजमेंट अँड व्हार्टिकल्चरल प्रॅटिसेस हे यु.जी.सी.मान्यताप्राप्त कोर्सेस सुरू आहेत. महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे दूरदृष्टी असलेले सर्व संस्था पदाधिकारी, सातत्याने कर्तव्यदक्ष असणारे प्राचार्य, कर्तव्यदक्ष अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग आणि जबाबदार, गुणवंत प्राध्यापक वृंद यामुळे महाविद्यालय दिवसेंदिवस उंच भरारी घेत आहेत.
ग्रामीण भागातील महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण
ग्रामीण भागातील गुणवत्ता सिध्द केलेले हे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालय स्वायत्ततेच्या दृष्टीने संस्था प्रयत्नशील आहे असल्याचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी सांगितले.
पारनेर महाविद्यालयाला आतापर्यंत ५३ पुरस्कार
पारनेर महाविद्यालय हे अद्यावत संगणीकृत महाविद्यालय, उत्कृष्ट निकालाची उज्ज्वल परंपरा असलेले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट प्राचार्य या पुरस्कारांबरोबरच विद्यापीठ व राज्यस्तरीय पातळीवर ३५ आणि राष्ट्रीय स्तरावर १८ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यामुळे या विद्यालयाला मिळालेले पुरस्कार व शैक्षणिक गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण ही ओळख या पारनेर महाविद्यालयाला मिळाले असल्याचे मत माजी सभापती राहुल झावरे यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS