रोख रक्कम लांबविली पारनेर | नगर सह्याद्री - नगर-कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात गुरुवारी पहाटे अडीच ते पावणेतीन...
रोख रक्कम लांबविली
पारनेर | नगर सह्याद्री -
नगर-कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात गुरुवारी पहाटे अडीच ते पावणेतीनच्या दरम्यान सहा आज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली असून या दानपेटीतील ४ हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी कर्जुले हर्या येथील भाविक दर्शनसाठी हरेश्वर मंदिरात गेले असता दानपेटी फोडण्याची घटना निदर्शनास आली. यासंबंधी पारनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
घटनेची माहिती कळतात हरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव शिवाजी शिर्के यांनी पारनेर पोलिसांना माहिती दिली. पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी देवस्थान ट्रस्टने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये सहा चोरटे दिसून येत आहेत. त्यातील चार जणांची तोंड बांधलेली आहेत. दोन जणांचे चेहरे उघडे आहेत. यापूर्वी अनेक वेळा हरेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. हे मंदिर मुख्य रस्त्याच्या कडेला असल्याने या महामार्गावरून येणारे चोरटे दानपेटीवर डल्ला मारतात. त्यामुळे कायमच होणार्या या दानपेटीच्या चोरीबाबत पारनेर पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
COMMENTS