प्राचार्य एकनाथ पठारे यांचा सेवापूर्ती निमीत्ताने सपत्निक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, विश्वस्त सीताराम खिलारी यांच्या हस्ते सत्कार निघ...
प्राचार्य एकनाथ पठारे यांचा सेवापूर्ती निमीत्ताने सपत्निक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, विश्वस्त सीताराम खिलारी यांच्या हस्ते सत्कार
निघोज | नगर सह्याद्री -
शाहु, फुले, आंबेडकरांचा वारसा जपणारी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पाठबळ देणारी ठरली असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी यांनीही मोठ्या प्रमाणात योगदान दिले असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे मुलिकादेवी विद्या मंदिर, निघोज या शाखेतील प्राचार्य एकनाथ पठारे हे आपल्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही संस्था आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झाली आहे. त्या विचारांच्या मुळेच परिसरातील मुलींचा माध्यमिक तसेच उच्च शिक्षणाचा मार्ग सुखकर झाला. खर्या अर्थाने ही शेतकर्यांच्या मुलांसाठी चालवली जाणारी संस्था आहे. त्याचबरोबर परिसरातील गावांमधील युवकांना रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण करण्यात संस्था यशस्वी झाली. प्राचार्य पठारे यांनी इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन करून विद्यार्थी घडविण्याचे काम केले अशी प्रशंसा केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी उपस्थित होते. आज विद्यालय महाविद्यालय या माध्यमातून या ठिकाणी चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कै. किसनराव वराळ पाटील यांची विकासाची दुरदृष्टी निघोज व परिसरातील विकासाला उज्वल परंपरा देणारी ठरली असून मच्छिंद्र आबा, संदीप पाटील व त्यानंतर संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी हा सामाजिक वारसा जतन करण्याचे काम केले असून सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटांसाठी विकासाभिमुख असल्याचे गौरवोद्गार खिलारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुष्पाताई वराळ, शिवाजीराव डेरे, सरपंच विठ्ठलराव जाधव, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ, डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे, प्राध्यापक आनंद पाटेकर, प्राध्यापक गोविंदराव देशमुख, दैनिक नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, सहसचिव भास्करराव कवाद, पत्रकार अमोल खिलारी, शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद, मोहन ढुमणे, रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, हिरामण कवाद, सोसायटीचे चेअरमन सुनील वराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, अध्यक्ष किसनराव घोगरे, माजी अध्यक्ष विलासराव हारदे, अशोकराव ढवळे, आप्पासाहेब वराळ पाटील, सुलतान सय्यद, विठ्ठलराव कवाद संतोष पठारे, संतोष शेटे, गणेश खोसे, नामदेव पांढरकर, आकाश वराळ, अस्लमभाई इनामदार, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पठारे यांनी संस्थेसाठी अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील व विश्वस्त सिताराम खिलारी सर यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला.
प्राचार्य एकनाथ पठारे हे सेवानिवृत्त झाले असले तरी या पुढील काळात संस्था हितासाठी ते काम करणार असून त्यांच्यावर संस्थेची महत्वपूर्ण जबाबदारी देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील यांनी देताच उपस्थीतांनी टाळ्या वाजवून झावरे पाटील यांच्या या महत्वपूर्ण घोषनेचे जोरदार स्वागत केले.
COMMENTS