महाविकास आघाडीचा निर्णय घेताना टाळल्याने ठाकरे गटाला बंडाची लागण शरद झावरे | नगर सह्याद्री - बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पारनेर तालुयात रा...
महाविकास आघाडीचा निर्णय घेताना टाळल्याने ठाकरे गटाला बंडाची लागण
शरद झावरे | नगर सह्याद्री -
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पारनेर तालुयात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी कार्यरत झाली असून ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार विजय औटी यांनी राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडी करताना विश्वासात न घेता व चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याने ठाकरे गटातील प्रमुख नेते बंडाच्या तयारीत आहेत. त्यातील काहींनी भाजपचा प्रचार सुरू केला आहे, तर काही लवकरच भाजपच्या गळाला लागण्याची चर्चा आहे.
पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतते प्रचारात सक्रिय झाले. जिल्हा परिषदे कृषी व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून त्यांनी याबाबत अधिकृत निर्णय घेतला नाही. ठाकरे गटाचे हे तीनही नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याची चर्चा पारनेर तालुयात आहे. पारनेर नगरपंचायतीतील ठाकरे गटाचे तीन नगरसेवक भाजप गोटात लवकरच सामील होणार असून त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे.पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी करत असताना विश्वासात न घेतल्याने पारनेर नगरपंचायतचे ठाकरे गटाचे नगरसेवक बंड करण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी सकाळी अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पारनेर तालुका दौर्यावर आले असताना भाळवणी येथे या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली.
त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शयता आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज नेतृत्व बाजार समिती निवडणूक आपणच जिंकणार असल्याचे गटनिहाय बैठकांतून सांगत असले तरी माजी आमदार विजयराव औटी यांचे प्रमुख शिलेदार बंडाच्या तयारीत आहेत. या नगरसेवकांत युवराज पठारे, ऋषी गंधाडे व देवराम ठुबे यांचा समावेश असून लवकरच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पारनेर शहरात ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांत मतभेद असताना राजकीय स्वार्थापोटी ही महाविकास आघाडी झाल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.
लवकरच ठाकरे गटातील मातब्बर अशा तीन नेत्यांचाही ठाकरे गटाला निरोप देण्याचा इरादा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुनिल थोरात यांनी युज अॅण्ड थ्रो ही भाजपाची संस्कृती नसून अधिकृत प्रवेश करणार्या प्रत्येकाचे वरिष्ठांच्या सहकार्याने पात्रतेनुसार राजकीय पूनर्वसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे महाविकास आघाडीतील बंडाच्या भूमिकेत अनेक पुढारी आहेत.
COMMENTS