मुंबई | नगर सह्याद्री उर्फी जावेद कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेदने अत्यंत कमी कालावधीत वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावरही उर...
मुंबई | नगर सह्याद्री
उर्फी जावेद कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेदने अत्यंत कमी कालावधीत वेगळी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावरही उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहमीच उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेत शर्ट न घालता एक फोटोशूट केले होते.
याचा एक व्हिडीओ चक्क उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उर्फी जावेद हिला धारेवर धरत खडेबोल सुनावले होते. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे यापूर्वी अनेकदा जीवे मारण्याच्या धमया मिळाल्या आहेत. कायमच उफीवर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते.
उर्फी आणि वाद हे समीकरण आहे. नुकतीच उर्फीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये उर्फीने अत्यंत मोठा दावा केलाय. कपड्यांमुळे आपल्याला एका मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश न दिल्याच्या दावा तिने केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उर्फीने लिहिले की, तुम्हाला मी आवडत नसेल तर माझ्याकडे दुर्लक्ष करा.
परंतु तुम्ही मला इग्नोर अजिबात करू शकत नाहीत. २१ व्या सदीमध्ये माझ्या कपड्यांमुळे मला रेस्टॉरंटमध्ये बंदी आहे. यावर माझा विश्वासच नाही. तुम्हाला माझी फॅशन आवडत नसेल तर ठिक आहे, पण माझ्यासोबत असा व्यवहार करणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे ही स्टोरी उर्फीने थेट नेारीें ला टॅग केलीये. यावर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. अनेकांनी उर्फीला सपोर्ट करण्यास सुरूवात केलीये, तर काहींनी रेस्टॉरंटने योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
COMMENTS