सुपा | नगर सह्याद्री राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जातेगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या अन्न क्षेत्रालयाला निधी कमी ...
सुपा | नगर सह्याद्री
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जातेगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानच्या अन्न क्षेत्रालयाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले.
पारनेर तालुयातील जातेगाव येथे खासदार डॉ. विखे यांनी श्री भैरवनाथ देवस्थान जातेगाव येथे भेट दिली यावेळे ते बोलत होते.श्री भैरवनाथ देवस्थान हे जागृत व स्वयभू देवस्थान आहे. अथिक वर्ष २०२२-२३ या वर्षात देवस्थान १० लाख रुपयाचा निधी दिलेला असून आर्थिक २०२३ ते २४ मधून २५ लाख रुपये देणार असल्याची घोषणा खा. विखे यांनी केली. निधी मिळावा म्हणुन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पोटघन, नारायणगव्हानचे माजी सरपच व विश्वस्त सुरेश बोरुडे, चेअरमन दत्तात्रय ढोरमले यांनी राहुल पाटील शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.
यावेळी खासदार विखे यांच्या हस्ते श्री काळ भैरवनाथाची आरती करण्यात आली व देवस्थान च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल पाटील शिंदे हे होते.यावेळी पंचकोशितील सर्व सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. अध्यक्षा सुनिता पोटघन, जातेगावचे सरंपच संजय गायकवाड, शिवराम पोटघन, गणेश वाखारे, वडनेरचे सरपंच चे लहु भालेकर, राजीव सोनुळे, सुपाचे सरपंच योगेश रोकडे, उपसरपंच दत्ता नाना पवार, सागर मैड, भाजपाचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, काशीनाथ नवले, मा चेअरमन बाळासाहेब चव्हान, माजी सैनिक सतिश गाडीलकर, अण्णा चव्हान, अनिल वाबळे, सोपान सर पोटघन, कडूसचे सरपंच मनोज मुगसे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढोरमले यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS