मुंबई । नगर सह्याद्री - आयपीएलचा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. या सामन्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हंगामाची सुरूवात शानदार झाली आहे...
मुंबई । नगर सह्याद्री -
आयपीएलचा १६ वा हंगाम सुरू झाला आहे. या सामन्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हंगामाची सुरूवात शानदार झाली आहे. आज म्हणजेच रविवारी लीगमधील दुसरा डबल हेडर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार खेळाडू विल जॅक्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याबाबतची माहिती आरसीबीचे हेड कोच संजय बांगर यांनी दिली आहे. आधीच आरसीबीचा धाकड गोलंदाज जोश हेझलवूड हा दुखापतग्रस्त आहे.
दुसरीकडे अष्टपैलू वानिंदू हसरंगा सुद्धा काही कारणास्तव पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामना सुरू होण्यापूर्वीच आरसीबी संघाच्या अडचणी वाढल्या आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपले खेळणार असल्याचे संजय बांगर यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, पायाच्या दुखापतीमुळे हेझलवूड लीगच्या पहिल्या उत्तरार्धात खेळणार नाही. आम्ही त्याचा अंदाज घेतला होता आणि लिलावापूर्वी त्यावर चर्चा झाली होती. रीस टॉपले हा त्याच्या चांगला बदली खेळाडू आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली. संघाने पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. पण राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यामुळे ते अंतिम फेरीत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा दमदार कामगिरीच्या जोरदावर बाद फेरीत पोहचण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल.
COMMENTS