मुंबई । नगर सह्याद्री - गौतमी पाटील हे नाव सध्या खूप जास्त चर्चेत आहे. गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये तिच्या कार्यक्रमांना तुफान गर...
मुंबई । नगर सह्याद्री -
गौतमी पाटील हे नाव सध्या खूप जास्त चर्चेत आहे. गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात. आता ती डान्स आणि कार्यक्रमाच्या पलीकडे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रात राजकीय कार्यक्रम, बैलाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असला की, गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतोच. गौतमी पाटीलचा क्रेझ इतका वाढला आहे की, तिच्या फॅन्सला तिच्याबद्दल एकूण एक गोष्ट जाणून घ्यायची असते. आयपीएलचा सिझन सुरु असताना, गौतमी पाटीलने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे.
तिला एका मुलाखतीदरम्यान मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने मुंबई इंडियन्स असं उत्तर दिलं आहे. तर आवडता क्रिकेटपटू कोणता? असा प्रश्न विचारला असता तिने क्षणाचा ही विलंब न करता एमएस धोनी असं सांगितले आहे. गौतमी पाटीलचा क्रेझ हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
COMMENTS