सांगली । नगर सह्याद्री - सांगली शहरामध्ये हृदयद्रावक एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक सिनेस्टाईल पाठलाग करत एका महा...
सांगली । नगर सह्याद्री -
सांगली शहरामध्ये हृदयद्रावक एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक सिनेस्टाईल पाठलाग करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.
माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. राजवर्धन राम पाटील असं 18 वर्षीय मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राजवर्धन वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
सायंकाळी सहाच्या सुमारास वसंतदादा साखर कारखान्याच्या गेट समोर राजवर्धन पाटील हा पळत होता आणि त्याच्या मागे तीन ते चार तरुण हातामध्ये चाकू आणि कोयता घेऊन पाठलाग करत होते. कारखाना गेटच्या हद्दीत या हल्लेखोरांनी राजवर्धनला गाठून त्याच्यावर कोयता आणि चाकूने वार करत त्याची हत्या केली आहे.
राजवर्धन राम पाटील हा मूळचा तासगाव तालुक्यातल्या मतकुणकी या गावचा असून सध्या तो बुधगाव या ठिकाणी राहत होता. सायंकाळी वसंतदादा कारखाना परिसरात आला असता हल्लेखार तरुण व राजवर्धन यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर थरारक पाठलाग करत हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
ज्या तरुणांनी ही ही हत्या केली ते कोण होते? कोणत्या कारणातून ही हत्या करण्यात आली? हे स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
COMMENTS