मुंबई । नगर सह्याद्री - भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वरती काढले आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी आलेल्य...
मुंबई । नगर सह्याद्री -
भारतात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वरती काढले आहे. यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी आलेल्या कोरोनाच्या तीन लाटेमुळे भारतातील लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवून आली होती.
यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण ही गमवावे लागले होते. अशातच पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेकांच्या मनात कोरोनाची चौथी लाट येणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. याचदरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांनी घाबरून न जाता कोरोनाच्या वाढत्या कारणांबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना प्रकरणांमध्ये होत असलेली सध्याची वाढ ही नवीन लाटेचे लक्षण नाही, असं तज्ज्ञांचे म्हणणे. त्यांचे म्हणणे आहे की, कोरोनाचे ही प्रकरणे काही दिवसात कमी होऊ शकतो. कदाचित एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात होऊ शकते.
जे लोक आधीपासूनच आधीच काही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत किंवा जे वृद्ध रुग्ण आहे. त्यांनी स्वतःची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कोविड प्रकरणांमध्ये सध्याची वाढ मागील तीन लाटेपेक्षा वेगळी आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसचा पॅटर्न 3 महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही केसेस त्याच प्रकारे वाढत होत्या. यावेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीमुळे लोक रुग्णालयात जात आहेत आणि त्यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळेच कोरोनाची आणखी प्रकरणे समोर येत आहे.
COMMENTS