अध्यक्ष नितीन पठारे यांची माहिती: यात्रेची तयारी पूर्ण सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील वाळवणे येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ देवाची ...
अध्यक्ष नितीन पठारे यांची माहिती: यात्रेची तयारी पूर्ण
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील वाळवणे येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा शुक्रवार दि. ७ रोजी संपन्न होत आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू असून यंदा मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पठारे यांनी दिली.
राज्यभरातून या भैरवनाथाच्या यात्रेसाठी लाखो भाविक हजेरी लावतात. या यात्रा उत्सवास सोमवार दि.३ एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे. या दिवशी देवाला तेल लावण्यात आले. याच दिवसापासून गावातील प्रत्येक घरातील किमान एक किंवा संपुर्ण कुटुंबाने सलग पाच दिवस उपवास धरण्याची परंपरा आहे. त्या नंतर पाचव्या दिवशी शुक्रवार दि. ७ व ८ एप्रिल रोजी मुख्य यात्रा भरणार आहे. यात्रेच्या दिवशी पहाटे देवाला स्नान व सकाळी महाआरती, तीन वाजता काठ्यांची मिरवणुक, रात्री महाआरती व छबिना मिरवणुक असते व दुस-या दिवशी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यात येणार असल्याची माहीती सरपंच संगीता गोरक्षनाथ दरेकर, उपसरपंच सचिन पठारे यांनी दिली.
पठारे म्हणाले की, यात्रेकरूसाठी पाणी, पार्किंग तसेच दर्शनासाठी चांगली व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेत व यात्रेत गडबडगोंधळ होऊ नये म्हणून स्वयंसेवकांची नेमणुकही केली आहे. मिठाई दुकानांसाठी मंदीरापासून दूर तर खेळणी व इतर दुकाणदारांसाठी रस्त्याच्या दुतर्फा सोय करण्यात येणार आहे. तर यात्रेकरूसाठी पारनेर, नगर येथून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवस्थान ट्रस्टच्या वतीने मध्य प्रदेश मधील उज्जैन महाकाल येथून विशेष डमरू पथक बोलवण्यात आले आहे. दोन दिवस चालणा-या यात्रे निमित्ताने सुमारे तीन लाख भाविका दर्शनासाठी येतील असा अंदाजही उपाध्यक्ष शहाजी दरेकर यांनी व्यक्त केला. यात्रा ऊत्सवाचा परीसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव चंद्रकांत पठारे, सहसचिव गोरक्षनाथ पठारे यांच्या सह देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे. यात्रेच्या दिवशी गोदावरी नदीचे कायगाव टोका येथून आणलेल्या व काशी येथून आनलेल्या गंगेच्या पाण्याने देवाला स्नान घतले जाते. त्या नंतर महाआरती होते व त्या नंतर येणार्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदीर खुले केले जाते.
यात्रेचे वैशिष्टे म्हणजे या यात्रेस राज्यभरातूनच नव्हे तर राज्याबाहेरूनही चंदनवाले म्हणून समजला जाणारा समाज भैरवनाथावर असलेली अपार श्रद्धा म्हणून यात्रेसाठी येतात. ही मंडळी यात्रे पुर्वीच येतात व यात्रा संपल्यावरही काही दिवस येथेच थांबतात. या काळात त्यांच्या मुलामुलींची लग्न जुळवणे, भेटीगाठी तसेच लग्न व इतरही काही धार्मिक कार्यक्रम ते येथेच करतात.
COMMENTS