मुंबई । नगर सह्याद्री - सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. फेब्रवारी महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत पावसांच्या सरी कोसळल्याने देशातील काही भा...
मुंबई । नगर सह्याद्री -
सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. फेब्रवारी महिन्याच्या अखेरच्या काही दिवसांत पावसांच्या सरी कोसळल्याने देशातील काही भागातील वातावरण थंड आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये तापमानात हळू-हळू वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना एप्रिल ते जून महिन्यात उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागणार आहे.
उत्तर पश्चिम भारतातील काही भाग सोडला तर देशातील काही भागात एप्रिल ते जून महिन्यात तापमान हे सामन्य तापामानापेक्षा अधिक असणार आहे. उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व राज्यात उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तीन आणि चार एप्रिलला उत्तर पश्चिम भारतात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र , गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये एप्रिलमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट सुरू होणार आहे. कमाल तापमानाहून ४.५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे.
खुल्या मैदानासारख्या भागात कमाल तापमान हे कमीत कमी ४० डिग्री सेल्सियस, किनारपट्टीत भागात ३७ डिग्री सेल्सियस असते. तर डोंगराळ भागात तापमान हे ३० डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचतं. यंदाचा उष्णतेची लाट अधिक दिवस राहण्याची शक्यता आहे .
COMMENTS