मुंबई । नगर सह्याद्री - गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झालेला नाही. त्यामुळे नेटकरी चकित झाले आहे. तिच्या या कार्यक्रमात अनेक तरुणी आ...
मुंबई । नगर सह्याद्री -
गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झालेला नाही. त्यामुळे नेटकरी चकित झाले आहे. तिच्या या कार्यक्रमात अनेक तरुणी आणि महिला देखील उपस्थित होत्या. या सर्वांनी गौतमीच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
गौतमीने तिच्या नृत्याच्या आणि अदाकारीच्या जोरावर संपूर्ण राज्यात प्रसिद्धि मिळवली आहे. काल चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
गौतमीचा डान्स पाहण्यासाठी फक्त तरुण मंडळीच नाही तर, वृद्ध लहान मुले आणि महिला देखील उपस्थित होत्या. प्रचंड गर्दी असूनही यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात कोणताही वाद अथवा राडा झालेला नाही. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटले की हाणामारी राडा या गोष्टी हमखास ऐकू येतात. मात्र आता तिने अशी काय जादू केली की या कार्यक्रमात कोणताही राडा झाला नाही याचा विचार नेटकरी करत आहे.
सध्या चाकणच्या आसपासच्या परिसरात गौतमीचे कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी सर्वच कार्यक्रम निर्विघ्न पार पडत आहे. काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावकऱ्यांनी गौतमीच्या आदाकारीला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला आहे. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
COMMENTS