लोणी | नगर सह्याद्री जलसंपदा विभागाकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा ठराव जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत लाभ...
लोणी | नगर सह्याद्री
जलसंपदा विभागाकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा ठराव जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत लाभार्थी शेतकर्यांकडून संमत करण्यात आला. शेतक-यांच्या मागणीची दखल घेत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळांतर्गत येणार्या प्रवरा कालव्यांच्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, तुकाराम बेंद्रे, मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, चेअरमन अशोकराव म्हसे यांच्यासह लाभक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. जलसंपदा विभागाकडून आकारण्यात येणार्या पाणीपट्टीचा विषय शेतक-यांनी उपस्थित केला. पाणीपट्टी माफ व्हावी, अशी मागणी केली. मंत्री विखे पाटील म्हणाले, कोविड संकटानंतर विविध क्षेत्रांना दिलासा देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. पाणीपट्टी कशी माफ होईल याबाबत शासन स्तरावरुन निश्चित प्रयत्न करू.
प्रवरा कालव्यांच्या अखत्यारीत चार्यांची कामे आणि त्या अवतीभवती असणारे अतिक्रमण काढण्याबाबत जलसंपदा विभागाने कडक धोरण घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
COMMENTS