मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मो...
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मोठा खुलासा केला. बॉलिवूडमध्ये मला कोपर्यात ढकलण्यात आलं होतं, म्हणूनच मी हॉलिवूडकडे वळले, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील बर्याच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला. मात्र याबाबत ती इतया वर्षांनंतर का व्यक्त झाली, असा प्रश्न अनेकांना पडला. प्रियांका लवकरच सिटाडेल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मी जेव्हा त्या पॉडकास्ट मुलाखतीत होते, तेव्हा मला माझ्या आयुष्याच्या प्रवासाविषयी विचारण्यात आलं होतं. मी १०, १५, २२, ३० आणि ४० वर्षांचे असताना काय काय घडलं याविषयी मोकळेपणे बोलले. माझ्या प्रवासातील सत्याविषयी मी बोलले. माझ्या आयुष्यातील त्या ठराविक काळाबद्दल बोलण्यासाठी आता माझ्यात आत्मविश्वास आहे. आज मी ज्याठिकाणी आहे, त्यामुळे मला भूतकाळात जे वाटलं त्याविषयी बोलण्यासाठी मी स्वतंत्र आहे. माझ्यासोबत जे घडलं होतं, त्यामुळे मी प्रचंड गोंधळलेल्या मनस्थितीत होते. पण खूप आधीच मी त्या सर्व गोष्टींना सोडून पुढे गेले आहे. माझ्या मानसिक शांतीसाठी त्या सर्व गोष्टींना मी माफ केलं आहे. म्हणून त्याविषयी आता मोकळेपणे बोलण्यास सोपं गेलं, असं प्रियांकाने सांगितलं. डॅस शेफर्डच्या पॉडकास्टमध्ये प्रियांका बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. मला इंडस्ट्रीत एका कोपर्यात ढकललं गेलं होतं. मला कोणत्याच भूमिका मिळत नव्हत्या. बॉलिवूडमधल्या राजकारणाला मी वैतागले होते आणि थकले होते. त्यातून मला ब्रेक हवा होता. म्हणून मी अमेरिकेला आहे, असं प्रियांका म्हणाली होती.
COMMENTS