अहमदनगर / नगर सह्याद्री - एखादी स्त्री असो किंवा पुरुष आजच्या काळात लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाची. इतरांपेक्षा वेगळं दिसण्याचा प्रत्येकाचा प...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
एखादी स्त्री असो किंवा पुरुष आजच्या काळात लाईफस्टाईल सगळ्यात महत्त्वाची. इतरांपेक्षा वेगळं दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे आपली त्वचा आणि आपले केस यावरच प्रत्येक जण लक्ष केंद्रीत करीत असतो.त्यामुळे या महत्वाच्या विषयावर त्वचा, केस आणि लेझर ट्रीटमेंट स्पेशलिस्ट डॉटर नेहा शिंदे यांनी दैनिक नगर सह्याद्री बरोबर केलेली बातचीत.
डॉटर तुम्हाला स्किन, हेयर स्पेशलिस्ट का बनावसं वाटलं?
डॉ.शिंदे: जशी तुम्ही आता माझे केस आणि त्वचा बघताय तसे ते काही दिवसांपुर्वी अजिबातच नव्हते.दोन्ही पण खूप जास्त खराब होते. त्वचा आणि केस खराब झाल्यामुळे माझा आत्मविश्वास खुपच कमी झाला होता.असे बर्याच लोकांना होते त्यामुळे या क्षेत्रामध्ये येवुन लोकांना मदत करायची होती. मला अगोदर त्वचेची काळजी कशी घ्यायची हे माहिती नव्हते.वर्षानुवर्षे चुकीच्या पद्धतीने लोकं त्वचेवर अन्यात करत आहेत.त्यात क्रिम निवडण्यापासुुन ती लावण्यापर्यंत प्रश्न आहेत.त्यामुळे त्वचा खराब होते.केसांचेही तसेच आहे. प्रत्येकाला केस गळण्याचा त्रास होतो.
त्वचा आणि केसांचे प्रश्न कोणते आहेत?
डॉ.शिंदे: माझा दवाखाना सुरु होवुन १ वर्ष झाले. हे दुसरं वर्ष आहे. १ वर्षात केसांचे प्रॉब्लेम असणारे पेशंट खूप जास्त पहिले आहेत. ७०% पेशंट केसांसदभर्घत प्रश्न घेवुन येतात. विशेष म्हणजे केसांच्या तक्रारी पहिले तिशीच्या नंतर यायच्या आता लहान मुलांना सुध्दा हा त्रास होतो.
केस गळतीचा प्रश्न हा वयानुसार येता, असं तुम्हाला म्हणायचंय का?
डॉ.शिंदे: नाही, आता अगदी सहावी, सातवीतील मुलींचे केस गळतात, मुलांचे केस गळतात. याला मुख्य कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली आहे. खाण्या, पिण्याच्या पद्धती बदल्या आहेत. आपण दिवसात किती पाणी पितो हे माहित नसतं.बाहेरच खाण जास्त प्रमाणात वाढलं आहे. आपण फळ किती खातो, डायट काय घेतो. हे महत्त्वाचं आहे.शरीराच्या काही आजारांमुळं केस गळतात. माणूस फिट असला तरी माणसिक तणाव खूप महत्त्वाचा आहे. नुकत्याच येवुन गेलेल्या कोविडनंतर केसांचे प्रश्न खूप वाढले आहेत.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
डॉ. शिंदे : केसांसाठी प्लाझ्मा थेरपी म्हणजे म्हणजे काय हे बर्याच लोकांना माहित नाही. केश रोपणाच्या अगोदर एक थेरपी असते ती म्हणजे प्लाझ्मा थेरपी. याने जर फरक पडला नाही तर केश रोपण केले जाते. जिथे अजिबातच केस नाहीत तिथे केश रोपण केले जाते. जिथे थोडेफार केस असतात.केसांची मुळे असतात. सपाट जमीनीत झाड लावण्यासारखी ही प्रक्रीया असते.
कुठले पेशंट केश रोपण आणि प्लाझ्मा थेरपी करू शकत नाहीत?
डॉ.शिंदे: ज्या लोकांना त्वचा रोग असतो, त्वचेवर जखमा असतील, ज्या लोकांना मधुमेह असतो,खुप जास्त उच्च रक्तदाब असणार्या लोकांना हे करता येत नाही.
सहा व सात वर्षाच्या मूलांचे केस पांढरे होण्याचे कारण काय?
डॉ.शिंदे:केसांसाठी हिमोग्लोबिन, झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, सेलेनियम,आवश्यक असते जर ते मिळत नसेेल तर केस पांढरे होणारच. त्यातच लहान मुलांमध्ये बाहेरच खाणं, घरच जेवण नसणे, कमी पाणी पिणे या सवयी आढळतात.
त्वचेचा आजार म्हणजे काय?
डॉ.शिंदे: कॉस्मॅटोलॉजी, डर्माटॉलॉजी ह्या दोन त्वचे संबंधित वेगळ्या गोष्टी आहेत. कॉस्मॅटोलॉजी मध्ये पिंपल, पिगमेंटेशन, पुरळ येणे ,वांगाचे डाग , डोळ्या खाली काळी वर्तुळे, शरीरावर पुरळ, प्रायव्हेट पार्ट पुरळ ,अशा तक्रारी आढळतात. डर्माटॉलॉजीमध्ये त्वचेचे सगळे आजार येतात. जळवात, पायाला भेगा पडणे, फंगल इन्फेक्शन होणे, कुरूप, सोरायसिस, एझिमा , स्किन कॅन्सर खूप ऍडव्हान्स स्टेज आहे.
लोकांना कडक पाण्याने आंघोळ करायची सवय असते. कडक पाणी केसांवरून घेतलं तर केस खराब होतात. सर्दीचा त्रास असेल, सायनसचा त्रास असेल तर कोमट पाणी वापरा.काही लोकांचा केसातील कोंडा जात नाही. कोंड्यामुळे चेहर्यावर पिंपल येतात. आपण केसांसाठी जो टॉवेल वापरतो तोच आपण चेहर्यासाठी वापरतो. त्याचा परिणाम त्वचेवर होतो.डोक्याला लावलेल्या जास्तीच्या तेलामुळे पिंपल वाढतात. गरजेपेक्षा जास्त शॅम्पु वापरल्याने त्याचे दुष्परिणाम होतात. तेल फक्त १ तास नाही तर दीड तास पेक्षा जास्त वेळ तेल लावायचं नाही.
तुमची ऑनलाइन देखील सुविधा आहे का?
डॉ.शिंदे: येणार्या महिन्यात आपण ऑनलाईन कंन्स्लटींग लॉन्च करणार आहोत.जेवढे नगरच्या बाहेरचे पेशंट आहेत.त्यांचं सगळ्यांचं औषध आपण कुरियर करतो.
बाहेरचे पेशंट आहेत त्यांनी ८६६८२७३२५८ या क्रमांकावर संपर्क करावा.
केसांसाठी होमियोपॅथी उपचार फार चांगले आहेत. आपण प्लाझ्मा थेरपी करतो त्या सोबत औषध देतो. हेयर टॉनिक देतो ते होमियोपॅथी आहे. शॅम्पू देतो त्यामध्ये आपण होमियोपॅथी औषध टाकून तयार करून देतो. शरीरातून काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठीही औषध देतो. डिप्रेशन, तणाव या सगळ्या गोष्टी मधून होमियोपॅथी निघायला खूप मदत करते.कॅनडाचे डॉ. शाहरुख शेख यांनी होमियोपॅथी काय करु शकते हे सांगितले आहे. डॉटर रोहित गुगळे यांचही आभार मानले पाहिजेत.याच ह्या दोन व्यक्तीमुळं मी होमियोपॅथीमध्ये आहे. डॉटर विद्या देशमुख यांच्या मुळे आत्मविश्वास वाढला.
COMMENTS