उत्तराखंड । नगर सह्याद्री - उत्तराखंडच्या मसुरी-डेहराडून रस्त्यावर रविवारी दुपारी प्रवासी वाहतूक बस दरीत कोसळल्याने भीषण अपघाताची घटना घडली ...
उत्तराखंड । नगर सह्याद्री -
उत्तराखंडच्या मसुरी-डेहराडून रस्त्यावर रविवारी दुपारी प्रवासी वाहतूक बस दरीत कोसळल्याने भीषण अपघाताची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ हून अधिक लोक होते. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे
पोलीस आणि आयटीबीपीच्या जवानांसह स्थानिक लोक जखमींना खड्ड्यातून बाहेर काढण्यात व्यस्त आहे. तीन जण गंभीर जखमी आहे. तर १९ जखमींना डेहराडूनला पाठवण्यात आले आहे.
मसुरी डेहराडून हायवेवर शेर घाडीजवळ मसुरीच्या पाच किमी आधी हा बसचा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत-बचावासाठी धावले आहे. बस मसुरीहून डेहराडूनला परतत असताना शेर घाडीजवळ 100 मीटर खोल दरीत कोसळली आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.
अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसले तरी, बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरातील बस अपघाताची ही दुसरी दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वीच केरळमधील सबरीमाला मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस खड्ड्यात पडली होती.
COMMENTS