पारनेर | नगर सह्याद्री सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांनी विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान...
पारनेर | नगर सह्याद्री
सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांनी विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० एप्रिल पर्यंत शेतकर्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासक साह्यक निबंधक गणेश औटी यांनी केले आहे.
कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी फेब्रुवारी व मार्च महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला ३५० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यासाठी २० एप्रिलपर्यंत शेतकर्यांनी कांदा विक्री केल्याची मूळ हिशेब पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबार उतारा, बँक पासबुकची पहिल्य पानाची स्पष्ट झेरॉस, आधार कार्ड झेरॉस, ज्या प्रकरणात सातबार उतारा वडिलांच्या नावे आहे व विक्री पट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबाच्या नावे आहे, अशा प्रकरणांमध्ये सहमत असणारे शपथपत्र आवश्यक आहे. यासंदर्भात लागणारा अनुदान मागणीचा अर्ज बाजार समिती कार्यालयात मोफत देण्यात येणार आहे. या सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करून अनुदान मागणीचा अर्ज देण्यात यावा, असे आवाहन बाजार समित प्रशासकांनी केले आहे.
शासनाने दि.१ फेब्रुवारी ते दि. ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना प्रती क्विंटल ३५०/- रुपये कांदा अनुदान जाहीर केलेले असुन बाजार समिती, पारनेरमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांनी दि.३ एप्रिल ते दि.२० एप्रिल २०२३ या कालावधीत कागदपत्रे जोडुन अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जमा करावेत. कांदा विक्रीची मुळ हिशोब पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बैंक पासबुकाची पहील्या पानाची सुस्पष्ट झेरॉस प्रत, आधारकार्डची झेरॉस प्रत, ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयाच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.
COMMENTS