मुंबई : नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोहळ्यातील अजून एक व्...
मुंबई : नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोहळ्यातील अजून एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रश्मिका मंदाना दिसत आहेत. या दोघांनी व्हिडीओमध्ये खास डान्सही केलाय. मात्र, यांच्या डान्सपेक्षा आलिया भट्ट हिची चर्चा होत आहे. कारण डान्स करण्यापूर्वी आलिया भट्ट असे काही करते की, ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड स्टारनेही हजेरी लावली. या सोहळ्यात रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट एकाच वेळी स्टेजवर येतात. मग काय रश्मिका मंदाना स्टेजवर म्हटल्यावर थेट नाटू नाटू गाणे सुरू होते. नाटू नाटू गाणे सुरू होताच रश्मिका मंदाना आलियासोबत डान्स करण्यास सुरूवात करते. त्याचवेळी आलिया मध्येच थांबते आणि थेट आपल्या पायातील चप्पल काढून फेकून देते आणि रश्मिका मंदाना हिच्यासोबत डान्सला सुरूवात करते. दोघीही जबरदस्त डान्स करताना दिसल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आलिया भट्ट हिला काही प्रश्नही विचारले आहेत. आलिया चप्पल काढून फेकते याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. आलियाचे हे कृत्य पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. अनेकांनी रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट यांचा डान्स आवडल्याचे म्हटले आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. रश्मिका मंदाना ही साऊथ चित्रपटांसोबत बॉलिवूड चित्रपटांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा गुड बाय हा चित्रपट काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला बॉस ऑफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत सामी सामी गाण्यावर डान्स करताना रश्मिका मंदाना ही दिसली होती. सलमान आणि रश्मिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.
COMMENTS