मुंबई : आता फॅशनचे रूपडेही काळानुसार अधिक भडक होऊ लागले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातून आता फॅशन ही काही साधीसुधी राहिलेली नाही. ...
मुंबई : आता फॅशनचे रूपडेही काळानुसार अधिक भडक होऊ लागले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यातून आता फॅशन ही काही साधीसुधी राहिलेली नाही. फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विक्षिप्तपणाचा आधार घेतला जातो आहे. उर्फी जावेद हे त्यातलं एक जिवंत उदाहरण. परंतु आता हिंदी चित्रपटांमध्ये आणि बॉलिवूड सेलिब्रेटींमध्येही विचित्र आणि आगळ्या वेगळ्या फॅशनला वाव मिळतो आहे. याचे दाखले मिळाले ते म्हणजे नुकत्याच झालेल्या नीता अंबानीच्या उच्चभ्रु पार्टीत. बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे त्यांच्या फॅशनची यावेळी चर्चा झाली. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेत्री दिशा पटानी हिच्याकडे. इन्टाग्रामवर नेहमीच बोल्ड आणि सेमी न्यूड फोटो शेअर करणारी दिशा पटानी आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल लुकसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोंना इन्टाग्रामवर प्रचंड लाईस असतात. त्याचसोबत दिशा आपल्या या बोल्ड लुकमुळे अनेकदा नेटकर्यांच्या निशाण्यावरही येते. यावेळी ती पुन्हा ट्रोल झाली आहे. यावेळी दिशाला आपल्याच चाहत्यांकडून टीका सहन करावी लागली. आपल्या बोल्ड फॅशनमुळे ओळखली जाणारी दिशा आपल्याच या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं परिधान केलेली साडी अत्यंत सुंदर असली आणि तिही त्या साडीत अत्यंत सुंदर दिसत असली तरी तिला मात्र मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी दिशानं असं काय केलं? ’त्या’ साडीमुळे ट्रोलसाडी हे एक अत्यंत सुंदर असं वस्त्र आहे. या साडीला पारंपारिक महत्त्व आहे. आजच्या काळात मुली आणि महिला आवडीनं साडीचा शृंगार करताना दिसतात. परंतु दिशा घातलेला ब्लाऊज आणि तिची साडी इतकी रिव्हिलिंग होती की त्यामुळे नेटकर्यांनी ’व्हलगर’, ’डर्टी’ अशा कमेंट्स केल्या. त्यातून तिची फॅशन पाहून उर्फी जावेदचं करिअर धोयात आहे, अशी खोचक टिकाही एका युझरनं केली.
COMMENTS