अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात: माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ...
अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात: माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १६२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व शिवसेना अशा तीनही पक्षातील दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने निडणुक तिरंगी होण्याची शयता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे माघारीसाठी ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत मुदत असल्याने राजकीय आडाखे सूरू झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुयातील एकमेव सुस्थितीत असलेली सहकारी संस्था आहे.पारनेर बाजार समीती राज्यात कांदा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छूक उमेद्वारांची सहाय्यक निबंधक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेना माजी आमदार विजय औटी व माजी सभापती काशिनाथ दाते, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली तर शिंदे - भाजपा गट विश्वनाथ कोरडे सुजित झावरे राहुल शिंदे वसंतराव चेडे विकास रोहकले यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवत आहेत. निवडणुकीत विद्यामान सभापती प्रशांत गायकवाड यांच्यासह गणेश शेळके, उपसभापती विलास झावरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, रामदास भोसले, राहुल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध़्यक्ष बाबाजी तरटे, अशोक सावंत, अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, बाबासाहेब तांबे, दौलत गांगड अरुण ठाणगे, शिवाजी बेलकर, शिवाजी खिलारी, सुरेश पठारे, शिवाजी लंके, पंकज कारखिले, लहु भालेकर, डॉ पद्मजा श्रीकांत पठारे, आबासाहेब खोडदे, अण्णा नरसाळे, सुनील गाडगे, सुनिल थोरात, मारूती रेपाळे,, कारभारी पोटघन यांच्या सह अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बुधवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर २० एप्रिल पर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. त्यामुळे त्या नंतरच खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी शिवसेना भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.
सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून ११ जागेसाठी विविध प्रवर्गातून १०९ इच्छूकांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सर्वसाधरण सात जागांसाठी ७५ अर्ज आहेत.ग्रामपंचायतच्या ४ जागांसाठी ३४ तर व्यापारी व आडते यांच्या २ जागांसाठी नऊ व हमाल मापाडी या एका जागेसाठी सुद्धा ९ उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत. या १८ जागांसाठी २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी मिळेल, पण मत देण्याचा अधिकार नाही..
सरकारच्या नविन सहकारी कायद्यानुसार शेतक-यांना प्रथमच बाजार समितीत निवडणुक लढविण्याची संधी मिळाली आहे. ज्या शेतक-यांच्या नावावर जमीन व सातबारा आहे. त्यास उमेदवारी करता येणार आहे. मात्र या शेतकरी उमेद्वाराला स्वताःचे मतही देता येणार नाही हेही या निवडणुकीचे वैशिष्टे म्हणावे लागले.
COMMENTS