मुंबई : एकीकडे प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की, तिला बॉलिवूडमध्ये साईडला केलं जात आहे आणि तिला चित्रपटांमध्ये कास्ट करण्...
मुंबई : एकीकडे प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की, तिला बॉलिवूडमध्ये साईडला केलं जात आहे आणि तिला चित्रपटांमध्ये कास्ट करण्यात येत नाही. त्यामुळेच ती हॉलिवूडमध्ये गेली. यानंतर आता विवेक ऑबेरॉयने नुकत्याच एका पत्रकार परिषदेत सिनेसृष्टीमागचं कटू सत्य सांगितलं आहे. त्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मी खूप खुश आहे की मी सगळ्या गोष्टींवर मात केली मात्र प्रत्येकजण इतका भाग्यवान नाही. असं म्हणत त्याने खळबळजनक वक्तव्य केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानविरोधातील पत्रकार परिषदेनंतर विवेकला कोणत्या छळाचा सामना करावा लागला, याचा खुलासा त्याने पत्रकार परिषदतेत केला. ऐश्वर्या रायसोबत सलमान खानचे ब्रेकअप झालं होतं तेव्हा तिच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला होता. यानंतर सलमान खानने त्याला धमकी दिली. या प्रकरणाबाबत विवेकने २००३ साली पत्रकार परिषदही घेतली होती. नुकत्याच एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने त्या दिवसांची आठवण करुन देत म्हटले, ’मी अनावश्यक गोष्टींमधून गेलो. अनेक लोकांचे लॉबिंग आणि राजकारण, ज्याबद्दल प्रियांकानेही सांगितलं. हीच आपल्या इंडस्ट्रीची ओळख आहे, हे खरंतर दुर्दैव आहे. ही बॉलीवूडची गडद बाजू आहे. जी मी देखील जवळून पाहिली आहे. मला माहित आहे की हे खूप निराशाजनक आहे, या सगळ्यामुळे तुम्हाला खूप कंटाळा येतो. एकीकडे मी शूटआऊट लोखंडवालाच्या यशाबद्दल पुरस्कार घेतला आणि पुढचे १४ महिने मी घरी बसून आहे. यातून गेल्यावर मी विचार करत राहिलो, मला काहीतरी वेगळं करायचं आहे जे मला पुढे घेऊन जाईल. विवेकने आपले लक्ष समाजसेवा आणि बिझनेसवर केंद्रित केलं. प्रियांकाने बाहेर जाऊन काहीतरी वेगळं शोधून काढलं जे तिच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट ठरलं, असे कौतूकही त्याने केले.
COMMENTS