अहमदनगर | नगर सह्याद्री कल्याण रोड परिसरात लवकरच २० कोटी रुपयांची रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू होणार आहेत.त्यामुळे या परिसरातील नागरिका...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कल्याण रोड परिसरात लवकरच २० कोटी रुपयांची रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू होणार आहेत.त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्त्याच्या कामासाठी ५५ लाख व विठ्ठल रुमिणी मंदिर परिसरातील ओपन स्पेस सुशोभीकरणाच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.
महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक आठ मधील कल्याण रस्ता ते फॅमिली विश्व मॉल पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी महिला बालकल्याण समितीचे सभापती पुष्पाताई बोरुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे, नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, जाधव उद्योग समूहाचे अँड जयंत जाधव, खासेराव शितोळे, हरिष खेडकर, एल बी म्हस्के, प्रा उत्तमराव राजळे, पारुनाथ ढोकळे, प्रा. भगवान काटे, परशुराम कोतकर, भाऊसाहेब थोटे, प्रा. लालचंद हराळ, भानुदास जगताप, प्रा. मनोहर गोबरे, श्रीधर जाधव, प्राचार्य बबन तोडकर, संजय सोनवणे, संतोष कोरडे, बाबासाहेब आंधळे, संजय सागावकर, पर्वतराव हराळ, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, प्रा.मदन काशीद, प्रा.अरविंद नागवडे, सुरेश पाटील, अभयजी शेंडगे, प्रा.बळवंत नागवडे, प्रा.बाळासाहेब मुर्तडक, दिनकर आघाव, प्रा. तानाजी काळुंगे, राजाराम रोहकले, राजाराम काकडे, बाबासाहेब कोतकर, एकनाथ मोटे मेजर, रामदास अडसुरे, संजीव सातपुते, सुशील नन्नवरे, भालचंद्र सोनवणे, बबन खैरे, महेश पाटील, गोरख गवळी, सुदाम ठाणगे, उत्तम खोडदे, हिरामण गुंड, रामकृष्ण देवकर, अँड सतिश गिते, नामदेव गुंड, आदिनाथ दहिफळे, प्रा.शिवराम कोरडे, माणिकराव लगड, अफसर पठाण, बाळासाहेब साळवे, मारुती कुलट, सर्जेराव चौधरी, सचिन झावरे, अँड चेतन रोहकले, अनिल शिंदे, संजय साकुरे, जयकुमार डिडवानिया, पोपटराव कडूस, शेखर ऊंडे, अण्णासाहेब सोनवणे, प्रा भगवान शेंडगे, मकरंद माने, लवांडे डॉ. भिवसेन डोंगरे, सचिन चितळे,विकास माने, विकास सोंडकर, भाऊसाहेब अडसुळ, मोहनराव नागवडे अमर अगरवाल, गजानन गटणे, नितीन वाघमारे, भास्कर महांडुळे, भाऊसाहेब शिंदे, भाऊसाहेब डेरे, विठ्ठल सुरम, राजेश पठारे, प्रा.रवींद्र देवढे, संतोष चौधरी, प्रा.डी.के सोनवणे, सुभाष झरेकर, योगेश राजापुरे, अशोक गांगर्डे, संतोष चेमटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या शुभहस्ते हरिष खेडकर यांचा राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल तसेच कल्याण रोड परिसरातील ज्यांनी नुकतीच पीएचडी प्राप्त केली असे प्रा बाळासाहेब मुर्तडक व प्रा.तानाजी काळुंगे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांचे यावेळी भाषण झाले. नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक शाम आप्पा नळकांडे,प्रा.खासेराव शितोळे यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक भगवान काटे यांनी केले. सूत्रसंचालन पारुला ढोकळे यांनी केले तर आभार रामदास अडसुरे यांनी मानले.
COMMENTS