राजस्थान / नगर सह्याद्री - दिल्लीच्या घटनेनंतर आता अजून एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या ...
राजस्थान / नगर सह्याद्री -
दिल्लीच्या घटनेनंतर आता अजून एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एका 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील एका भग्न वाड्यात तिच्या मृतदेहाचे तुकडे पडल्याचे आढळले आहे. उदयपूरच्या मावली भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह आढळल्यानंतर 24 तासांनी या घटनेचा खुलासा केला. या प्रकरणी एका तरुणाच्या बलात्कार व हत्येप्रकरणी मुसक्या आवळण्यात आल्या आहे.
एसपी विकास शर्मा यांनी सांगितले की, मुलगी सरकारी शाळेतील इयत्ता चौथीत शिकत होती. 4 दिवसांपूर्वी शाळेतून आल्यानंतर ती शेताकडे निघाली, पण शेतात पोहोचलीच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. पण तिचा शोध न लागल्याने त्यांनी 28 मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा सलग 4 दिवस शोध घेतला. अखेर शनिवारी सायंकाळी उशिरा तिच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील एका भग्नावशेष वाड्यात तिचा मृतदेह आढळला.
आरोपीने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे - तुकडे केले होते. पोलिसांनी ते गोळा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर रविवारी सकाळी तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.
एसपीने सांगितले की, या प्रकरणी कमलेश (21) नामक तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यात कमलेशने बलात्कार व हत्येची गोष्ट कबूल केली. आरोपीने सांगितले की, मुलीचे अपहरण केल्यानंतर मी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर धारदार सुरीने स्वतःच्या घरात तिच्या हाता-पायासह संपूर्ण शरिराचे 10 तुकडे केले. त्यानंतर छिन्नविच्छिन्न स्थितीतील तिचा मृतदेह थैलीत भरून निर्जन स्थळी फेकून दिला. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे.
मृत मुलीच्या चुलत्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी हा कठला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सरकारकडे नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.
COMMENTS