पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहरातील अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या श्री साई मल्टिस्टेट पतसंस्थेस आर्थिक वर्षात १ कोटी ८२ लाख रूप...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर शहरातील अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या श्री साई मल्टिस्टेट पतसंस्थेस आर्थिक वर्षात १ कोटी ८२ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहीती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव चेडे यांनी दिली.
वसंतराव चेडे यांनी सांगितले की, संस्थेकडे १ कोटी ५५ लाख रूपयांचे भाग भांडवल असून ५६ कोटी १० लाख रूपयांच्या ठेवी आहेत. ४१ कोटी ३२ लाख रूपय कर्ज वितरण करण्यात आले आहे तर १७ कोटी ६४ लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे व्यवस्थापक प्रशांत बढे यांनी सांगितले. संस्थेच्या पारनेर, ढवळपुरी, कान्हूरपठार व अळकुटी शाखांमध्ये लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पारनेर शहर, ढवळपुरी, कान्हूरपठार, शिरूर व अळकुटी येथे संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत.व्यवसायीक, शेतकरी, युवा उद्योजक यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असून आजवर अनेक व्यवसायिक, शेतकरी तसेच युवा उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यात येउन त्यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी साई मल्टिस्टेट पतसंस्थेने हातभार लावला आहे. संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे ठेवीदारांचा ओघही चांगला असून विविध सुविधांमुळे ग्राहकांची या संस्थेस पसंती असल्याचे ते म्हणाले.
साई ग्रामीण संस्थेस ६५ लाख नफा
वसंत चेडे यांच्या नेतृत्वाखालील साई ग्रामीण पतसंस्थेस गेल्या आर्थिक वर्षात ६५ लाख २० हजार रूपयांचा नफा झाला. या संस्थेचे भाग भांडवल ७० लाख रूपये असून २० कोटी २६ लाख रूपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी १६ कोटी ४७ लाख रूपये कर्ज वितरण करण्यात आले असून ६ कोटी २५ लाख रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
COMMENTS