राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांची पत्रकार परिषदेत टिका श्रीगोंदा | नगर सह्याद्री विरोधकांकडून तालुक्यात गलिच्छ राजकारण सुरु असून राहुल ...
राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस यांची पत्रकार परिषदेत टिका
श्रीगोंदा | नगर सह्याद्रीविरोधकांकडून तालुक्यात गलिच्छ राजकारण सुरु असून राहुल जगपात आणि अण्ण्साहेब शेलार यांनी पोरकटपणा सोडून आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवू नयेत, अशी टीका राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांनी पत्रकार परीषदेत केली.
भोस म्हणाले, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार, जगताप व शिर्के यांनी बाबासाहेब भोस नेमके कोणत्या पक्षात आहेत? ते कधीच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाहीत, असा आरोप केला होता. मी यापूर्वीच जाहीर केले आहे की, शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता असून राष्ट्रवादीतच आहे. श्रीगोंदा तालुयात विविध स्थानिक संस्थांमध्ये पक्ष विरहित राजकारण न करता सहमतीच्या राजकारणातून पदाधिकारी निवडावेत. काही संस्था शेतकर्यांच्या दृष्टीने कारभार पाहतात. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहमती दर्शवली होती. परंतु या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल असताना नागवडे व पाचपुते यांचे उमेदवार कसे पडतील असा निर्णय काही चांडाळ चौकडींनी राबवत गलिच्छ राजकारण सुरू केले. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा चेअरमन आणि काँग्रेसचा व्हाईस चेअरमन असा फॉर्मुला ठरला होता. तो देखील पाळला नाही. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही महाविकास आघाडीचा धर्म स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाळावा हे ठणकावून सांगितले होते. ते देखील जगताप, शेलार, नाहाटा यांनी पाळले नाही. आम्हाला मात्र नेमके तुम्ही कोणत्या पक्षात आहेत? असा सवाल केला जात आहे. आमच्यावर आरोप करणार्यांनी स्वतःचे चारित्र्य एकदा तपासून पहावे. तालुयात काही संस्थांचे दर्जेदार काम आहे. त्या संस्थेमध्ये राजकारण न करता सहमतीने पदाधिकारी निवडावेत. ही आमची भावना होती. कुकडीच्या उष्ट्या पत्रवाळी चाटणार्यांनी मला हे सांगावे, असा टोलाही हरिदास शिर्के व अण्णासाहेब शेलार यांना भोस यांनी लगावला.
राजेंद्र नागवडे म्हणाले, पाठीमागे वळून पाहिल्यावर राहुल जगताप यांना सहकार महर्षी बापूंनी मोठी मदत करत आमदार केले. अण्णासाहेब शेलार यांना देखील साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समितीत मदत केली. बाळासाहेब नाहाटा यांनाही भानगाव पंचायत समितीतून नागवडे कुटुंबाने खंबीर साथ दिली. तालुयातील सर्वच नेत्यांना नागवडे कुटुंबांनी मदत केली. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळता पाडापाडीचे राजकारण केले. तालुयात काही मंडळी गलिच्छ राजकारण करण्यामध्ये पटाईत आहेत. बाजार समिती ही शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मातृ संस्था आहे.
COMMENTS