मुबंई नगर सह्याद्री नागराज अण्णांनी घर बंदूक बिरयाणी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाका...
मुबंई नगर सह्याद्री
नागराज अण्णांनी घर बंदूक बिरयाणी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार सल्या, बाळ्या, प्रिन्स आणि जब्या म्हणजे अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गलगुंडे यांना सोबत नेले नसल्याने हे कलाकार नागराज मंजुळे व आकाश ठोसरवर नाराज असल्याची भावना यांनी व्यक्त केली. ‘घर बंदूक बिरयानी’ हा नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अभिनित चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे प्रमोशन महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्यात आले. या चित्रपटातील अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गलगुंडे कलाकार यांनी एका मुलाखतीत याबद्दल महिती दिली. मुलाखतीवेळी हे कलाकार एकमेकांना विचारतांना दिसत आहे की तू प्रमोशनासाठी का गेला नाही ? नागराज मंजुळे याच्या चित्रपटात कलाकार हे ठरलेले असतात. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर, अरबाज शेख, सुरज पवार, सोमनाथ अवघडे, तानाजी गळगुंडे दिसणार आहे. नागराज अण्णांचे आकाश ठोसरवरच प्रेम आहे. ते प्रमोशनसाठी आकाशलाच सोबत नेतात, आम्हाला नाही. त्यामुळे आम्ही नागराज अण्णांवर नाराज आहे
COMMENTS