चेअरमन अशोक कटारिया | सभासदांच्या हिता करिता अनेक मागण्या रिज़र्व बँकेकडे सादर अहमदनगर | नगर सह्याद्री नगर अर्बन बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त ...
चेअरमन अशोक कटारिया | सभासदांच्या हिता करिता अनेक मागण्या रिज़र्व बँकेकडे सादर
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर अर्बन बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांची संख्या एक हजार २३६ इतकी आहे. त्यांच्या ठेवी सुमारे २१४ कोटींच्या आहेत. ठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंत ठेवी डीआयसीजीसी’ मार्फत परत केल्यानंतर पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांच्या उर्वरित ठेवींच्या रक्कमा त्यांना परत मिळाव्या यासाठी बँकेकडे आज मितीला २६६ कोटी निव्वळ अधिशेष तरलता अशी पर्याप्त तरलता उपलब्ध असल्याने ठेवीदारांचे पैसे परत करण्याची विनंती भारतीय रिज़र्व बँकेकडे करण्यात आली आहे. या सोबतच दोन हजार १०० हूण अधिक ठेवीदारांना आजारपण, शिक्षणा कामी, लग्न कार्य साठी तसेच जेष्ठ सभासदांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ११ कोटी रक्कमांच्या त्यांच्या ठेवी हार्डशिप खाली परत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक कटारिया यांनी दिली.
तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेला सोनेतारण कर्ज सारखे शाश्वत कर्ज चालू करण्याची मागणी देखील बँकेला उत्पन्न सुरु व्हावा या करिता करण्यात आली आहे. या बरोबर डीआयसीजीसी’ मार्फत ३रा लेम मंजूर करुन मिळण्याकामी देखील रिज़र्व बँक व डीआयसीजीसी’ कडे नगर अर्बन बँकेमार्फत पाठपुरावा करण्यात आला आहे. ठेवीदारांचे हक्काचे पैसे डीआयसीजीसी’ मार्फत अदा करण्यात यदाकदाचित सदर ३रा लेम मंजूर करण्यास पुढे विलंब करण्यात आला तर ठेवीदारांच्या हक्काचे पैसे त्यांना वेळेत मिळावे या करिता माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा ठराव संचालक मंडळात मंजूर करण्यात आला आहे व परिणामस्वरूपी उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे.
तसेच बँकेत ठेवीदारांच्या ठेवींच्या अनुषंगाने ठेवीदारांना त्यांच्या ठेवीतून बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्ता संबंधी लिलावात भाग घेऊन मालमत्ता विकत घेता यावी याकरिता देखील रिझर्व्ह बँकेकडे विनंती करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच बँकेच्या कर्जदारांचे कर्ज खाते नूतनीकरण करण्यास मंजुरी दिलेली आहे व त्याच धर्तीवर बँकेने केलेल्या पाठपुराव्या च्या अनुषंगांने केलेल्या विविध मागण्यांना लवकरच मंजुरी मिळेल अशी गवाही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. कर्जदारांनी लवकरात लवकर आप आपली कर्ज खाती नूतनीकरण करुन घ्यावी व बँकेला सहकार्य करावे असेही संचालक मंडळाकडून आव्हान करण्यात आले आहे. ऱिझर्व्ह बँकेसोबत याबाबींचा सर्व पाठपुरावा संचालक ईश्वर अशोक बोरा व गिरीश लाहोटी करत असून व्हाईस चेअरमन दीप्ती सुवेंद्र गांधी तसेच संपूर्ण संचालक मंडळ एकदिलाने व एकजुटीने बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. साळवे तसेच सर्व कर्मचार्यांच्या सोबतीने करत असून लवकरच बँकेला पुर्व पदावर आण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे.
COMMENTS