नवी मुंबई नगर सह्याद्री : नवीन लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना सासरच्या लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्या महिलेला दिसण्यावरून, मुल ल...
नवी मुंबई नगर सह्याद्री :
नवीन लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना सासरच्या लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्या महिलेला दिसण्यावरून, मुल लवकर होत नाही, यासारख्या अनेक बाबीं ऐकून घ्याव्या लागतात. अश्या गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने सुनेला मानसिक त्रास दिलेला ऐकले आहे. आता तर सासू आणि नवऱ्याने हद्दच पार केली. स्त्रील मुलं होत नसेल तर यात तिची एकटीची काय चूक? हे समजून न घेता नको ते आरोप केले. आरोपावरच न भागता विवाहितेला सासरकडील मंडळींनी एका भोंदूबाबाशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच समाधान ना मानता तिची इच्छा नसतानाही बळजबरीने तिच्या नवऱ्याने त्याच्या मित्राशी तिला शारीरिक संबंध करण्यास बळजबरी केली, अशी धक्कादायक घटनेची तक्रार विवाहितेने पोलिसांत दिली आहे.
पतीसह सासरकडील मंडळींविरोधात ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून छळवणुकीसह विनयभंग, बलात्कार, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पूर्व भागात राहणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. मात्र तिला वर्षभरानंतरदेखील मूल होत नसल्याने तिच्या पतीने ४ वेळा कृत्रिमरीत्या गर्भधारणा (आयव्हीएफ) करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्नसुद्धा यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे तिच्या पती, सासरकडील मंडळींनी तिला मूल व्हावे यासाठी डोंबिवलीतील एका भोंदूबाबाशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्याप्रसंगी भोंदूबाबाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या पतीने मित्राशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचे चित्रीकरण केले. चित्रीकरण करून स्वतःच्याच पत्नीला ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला त्याच मित्राशी अनेक वेळा शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र विवाहितेने शरीरसंबंध ठवण्यास विरोध केल्यास तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. तसेच तिने घटस्फोट द्यावा, यासाठी ऑक्टोबर महिन्यात तिला मारहाण करून घरातून बाहेर काढले, अशी तक्रार नेरूळ पोलिसांत देण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासरे, चुलतसासरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला, याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. २१ लाखांचा हुंडा विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून घेतला होता. १७ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच ३ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली असून पोलिस अधिक तपास पोलीस करत आहे. मुल होत नसल्याने बाहेर संबंध ठेवण्यास भाग पाडले
नवी मुंबई नगर सह्याद्री :
नवीन लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना सासरच्या लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्या महिलेला दिसण्यावरून, मुल लवकर होत नाही, यासारख्या अनेक बाबीं ऐकून घ्याव्या लागतात. अश्या गोष्टी ऐकत काही विवाहितांना दिवस काढावे लागतात. अनेक वेळा आपण सासूने सुनेला मानसिक त्रास दिलेला ऐकले आहे. आता तर सासू आणि नवऱ्याने हद्दच पार केली. स्त्रील मुलं होत नसेल तर यात तिची एकटीची काय चूक? हे समजून न घेता नको ते आरोप केले. आरोपावरच न भागता विवाहितेला सासरकडील मंडळींनी एका भोंदूबाबाशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच समाधान ना मानता तिची इच्छा नसतानाही बळजबरीने तिच्या नवऱ्याने त्याच्या मित्राशी तिला शारीरिक संबंध करण्यास बळजबरी केली, अशी धक्कादायक घटनेची तक्रार विवाहितेने पोलिसांत दिली आहे.
पतीसह सासरकडील मंडळींविरोधात ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून छळवणुकीसह विनयभंग, बलात्कार, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पूर्व भागात राहणाऱ्या तरुणाशी या तरुणीचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. मात्र तिला वर्षभरानंतरदेखील मूल होत नसल्याने तिच्या पतीने ४ वेळा कृत्रिमरीत्या गर्भधारणा (आयव्हीएफ) करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्नसुद्धा यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे तिच्या पती, सासरकडील मंडळींनी तिला मूल व्हावे यासाठी डोंबिवलीतील एका भोंदूबाबाशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्याप्रसंगी भोंदूबाबाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या पतीने मित्राशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचे चित्रीकरण केले. चित्रीकरण करून स्वतःच्याच पत्नीला ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला त्याच मित्राशी अनेक वेळा शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मात्र विवाहितेने शरीरसंबंध ठवण्यास विरोध केल्यास तिला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. तसेच तिने घटस्फोट द्यावा, यासाठी ऑक्टोबर महिन्यात तिला मारहाण करून घरातून बाहेर काढले, अशी तक्रार नेरूळ पोलिसांत देण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासू-सासरे, चुलतसासरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला, याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. २१ लाखांचा हुंडा विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून घेतला होता. १७ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच ३ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली असून पोलिस अधिक तपास पोलीस करत आहे.
COMMENTS