नाशिक नगर सह्याद्री नाशिक येथील सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे गावात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात महाप्रसादाचे आयोजन करण...
नाशिक नगर सह्याद्री
नाशिक येथील सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे गावात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादातून सुमारे ५० पेक्षा जास्त भाविकांविकाच्या पोटात अचानक पणे दुःखू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणीतून अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक समोर आला. यातील काही जणांनावर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर काहींना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
समजलेल्या माहितीनुसार, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बाऱ्हे येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सप्ताहाचे ७ एप्रिल रोजी काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होउ लागला. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तातडीने ग्रामीण आरोग्य केंद्रात धाव घेतली. एक एक करत जवळपास ७० ते ८० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. सप्ताहाच्या महाप्रसादाचे मोठया प्रमाणात लाभ घेतल्यानतंर नागरीकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाली. यानंतर या घटनेची माहितीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विषबाधेच्या घटनेनंतर आरोग्य प्रशासनाने गंभीर दखल घेत महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. बाधितांची संख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. काहींना प्रथमोपचारनंतर सोडून दिले तर काहींना ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत. प्रकृती चिताजनक असलेल्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले.
COMMENTS