x नवी दिल्ली नगर सह्याद्री : आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करण्याऱ्या भारतातील अनेक मुख्यमंत्री कोट्याधीश असल्याचे जगासमोर आले आहे. याबाबत स...
नवी दिल्ली नगर सह्याद्री :
आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करण्याऱ्या भारतातील अनेक मुख्यमंत्री कोट्याधीश असल्याचे जगासमोर आले आहे. याबाबत सर्वेक्षणात विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या ३० पैकी २९ मुख्यमंत्र्यांकडे लाखोंची मालमत्ता गोळा केली आहे. या यादीत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री ११ नंबरला आहे. देशातील या यादीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे एकूण ५१० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. धनवान मुख्यमंत्र्यांच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या १५ लाखांच्या संपत्तीसह शेवटच्या क्रमांकावर आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रत्येकी मालमत्ता तीन कोटी रुपये आहे, असे या केलेल्या सर्वेक्षणात सागितले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित मिळून ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेलय स्वत:च्या मतदान प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्र्यांबाबत निष्कर्ष काढले असल्याचे समजले आहे
सर्वाधिक मालमत्ता असलेले अव्वल तीन मुख्यमंत्री (आकडे कोटी रुपयांत)
५१० - जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश), १६३ - पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश), ६३ - नवीन पटनाईक (ओडिशा)
सर्वांत कमी मालमत्ता असलेले तीन मुख्यमंत्री (आकडे रुपयांत)
१ कोटी - पिनराई विजयन (केरळ), १ कोटी - मनोहरलाल खट्टर (हरियाना), १५ लाख - ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)v
COMMENTS