मुंबई । नगर सह्याद्री - सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे. या...
मुंबई । नगर सह्याद्री -
सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या सत्तासंघर्षावरील निकाल पुढील १० दिवसात येण्याची शक्यता आहे. या सर्वाोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाची बाजू जेष्ठ वकील निरज किशन कौल आणि जेष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडत आहे. तर ठाकरे गटाची बाजू जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी मांडत आहे. सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल पुढील १० दिवसात येणार असल्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे राज्यमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 10 दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याने साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं यावर राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. त्यानंतरच होणार मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
COMMENTS