छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच काल एका मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली.
मुंबई / नगर सह्याद्री -
छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच काल एका मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली या तरुणीचे रस्त्यावरून अपहरण करण्यात आले आहे. तरुणी रस्त्यावरून जात असताना अचानक मुलाच्या टोळक्याने तिचा रस्ता अडवला. तरुणीला रिक्षात बसण्यास सांगितले. घटनेच्या वेळी रस्त्यावर गर्दी झाली होती. मात्र या टोळक्याने मोठी दहशत पसरवली. त्यामुळे इतर लोकही घाबरले.
ही तरुणी एका स्पा सेंटरच्या मॅनेजरकडे सिमकार्ड घेण्यासाठी गेली होती. त्याचवेळी सहा ते सात टवाळखोरांनी तिला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अपहरण केले आहे. हमारे साथ चलो नही तो काट देंगे अशी धमकी देऊन त्यांनी रस्त्यावर दहशत निर्माण केली. शहरातील मोंढा नाका परिसरात हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी बीबी का मकबरा परिसरात मित्रासोबत बोलणाऱ्या तरुणीला मारहाण करत छेड काढल्याची घटना ताजी असतानाच आता ही घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. यासोबतच शहरात हे काय चालले आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
COMMENTS